मराठी बातम्या /बातम्या /देश /

BIG NEWS: ‘हिज्जबुल’च्या टॉप कमांडरचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश

BIG NEWS: ‘हिज्जबुल’च्या टॉप कमांडरचा खात्मा, काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश

श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या ठिकाणी घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली.

श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या ठिकाणी घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली.

श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या ठिकाणी घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली.

  • Published by:  Ajay Kautikwar

श्रीनगर01 नोव्हेंबर: जम्मू आणि काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) सुरक्षा दलाला आज मोठं यश मिळालं. राजधानी श्रीनगरच्या जवळ झालेल्या एका कारवाईत हिज्जबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर (Hizbul Mujahideen Chief Commander) ठार झाला आहे. डॉ. सैफुल्ला (Dr Saifullah ) असं त्या दहशतवाद्याचं नाव असून तो हिज्जबुल’चाच कडवा दहशतवादी असावा अशी आमची 95 टक्के खात्री असल्याची माहिती IGP विजय कुमार यांनी दिली आहे. त्याच्या कुटुंबीयांना ओळख पटविण्यासाठी बोलावण्यात आलं असून लवकरच आम्ही त्याची घोषणा करू असही त्यांनी सांगितलं.

श्रीनगरजवळच्या रंग्रेट भागात हा दहशतवादी आला असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने तो लपलेल्या ठिकाणी घराला वेढा दिला. त्यानंतर कारवाईला सुरूवात झाली. पोलिसांनी त्याला शरण येण्याचं आवाहन दिलं. मात्र तो शरण आला नाही. त्याने गोळीबार सुरू केला.

या गोळीबारात सैफुल्ला मारला गेल्याची माहिती आहे. स्थानिक खबऱ्यांनी ही माहिती दिली होती. तौ सैफुल्लाच असेल तर ते सुरक्षा दलाचं मोठं यश आहे असंही विजयकुमार यांनी सांगितलं. काही तास ही चकमक सुरू होती.

गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांच्या जम्मू-काश्मीरमध्ये कुरापती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्च ऑपरेशन करून त्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाकडून मोठी मोहीम राबवली जात आहे. काही दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांमधील एक म्होरक्या मारला गेल्याचीही माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली होती.

ड्रोन हल्ल्याचा कट उधळला

काश्मीरमधल्या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करतो ही बाब आता काही नवीन राहिलेली नाही. या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणं, आर्थिक मदत करणं आणि शस्त्र पुरवठा करण्याचं काम पाकिस्तान गेली कित्येक दशके करत आहे. पाकिस्तानचा एक आणखी डाव भारतीय सुरक्षा दलांनी काही दिवसांपूर्वीच उधळून लावला आहे. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मीरातल्या दहशतवाद्यांना शस्त्र पुरवठा करतो हे स्पष्ट झालं असून लष्कर ए तोयबाच्या 3 दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.

या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानमधून या दहशतवाद्यांना राजौरी जिल्ह्यातल्या दुर्गम भागात ड्रोनच्या माध्यमातून शस्त्रे पाठविण्यात आली होती. ती शस्त्रे आणण्यासाठी हे दहशतवादी निघाले होते त्यांना अटक करण्यात आली आहे.

दक्षिण कश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातले ते रहिवासी असून राहिल बशीर, आमिर जान आणि हाफिज युनिस अशी त्यांची नावे आहेत.

First published:

Tags: Jammu and kashmir