जम्मू काश्मीर हाय अलर्टवर, २० दहशतवाद्यांची घुसखोरी, हल्ल्याची शक्यता

नियंत्रण रेषा पार करत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Jun 2, 2018 10:07 AM IST

जम्मू काश्मीर हाय अलर्टवर, २० दहशतवाद्यांची घुसखोरी, हल्ल्याची शक्यता

02 जून : नियंत्रण रेषा पार करत दहशतवाद्यांनी मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यात घुसखोरी केली असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानव्याप्त काश्मीमधून जवळपास २० दहशतवाद्यांना काश्मीरमध्ये घुसखोरी केली आहे.

घुसखोरी करणारे दहशतवादी मसूद अजहरच्या जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचे असल्याचं समजत आहे. दहशतवादी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. खासकरुन काश्मीर खोऱ्याला लक्ष केलं जाण्याची शक्यता आहे अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आलं असून राज्यातील संवेदनशील भागांमध्ये पहारा ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावरुनच पाकिस्तानात बसलेले हॅण्डलर्स काश्मीरमध्ये हिंसा घडत राहावी यासाठी किती प्रयत्न करत आहेत हे दिसत असल्याचं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 2, 2018 10:07 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...