श्रीनगर, 4 नोव्हेंबर : काश्मीरला विशेष दर्जा देणारा घटनेतला अनुच्छेद 370 काढून टाकल्यानंतर केंद्राने घातलेले निर्बंध शिथील होताच काश्मीरमध्ये हिंसाचार सुरू झाला आहे. श्रीनगरचा मुख्य चौक असलेल्या लाल चौकाजवळच सुरक्षा दलांवर झालेल्या हल्लायत एक जण मृत्युमुखी तर 20 जण जखमी झाले आहेत. गेल्याच आठवड्यात अतिरेक्यांनी सोपोरमध्ये केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात 20 जण जखमी झाले होते.
लाल चौकाजवळ असलेल्या हरि सिंह रोड बाजारात हा ग्रेनेड हल्ला झाला. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी हाय स्ट्रीट बाजारात हा हल्ला झाला. या ग्रेनेड गल्ल्यात एकाचा जीव गेला आहे. दोन जण गंभीर जखमी आहेत तर अन्य 13 जण जखमी आहेत.
Jammu and Kashmir: 15 people injured in a grenade attack in a market on Maulana Azad Road in Srinagar. pic.twitter.com/9FxKB28nzg
— ANI (@ANI) November 4, 2019
श्रीनगरचा हा भाग ऐन बाजाराचा भाग आहे. सर्वात जास्त वर्दळीचा हा भाग मानला जातो.
वाचा - धक्कादायक; ज्या जिल्ह्यात करतारपूर गुरुद्वारा तेथेच दहशतवादी कॅम्प!
या ठिकाणी हल्ला करताना अतिरेक्यांनी सुरक्षा दलालाच लक्ष्य केलं, असं समजतं. इथे तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधला आणि ग्रेनेड फेकले. पण ग्रेनेड रस्त्याच्या कडेला जाऊन फुटला. त्यामुळे सामान्य नागरिकच मोठ्या प्रमाणावर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर झालेली नाही.
ही बातमी अपडेट होत आहे.
--------------------------------
राज्यपालांना भेटण्यामागचं संजय राऊत यांनी सांगितलं कारण, पाहा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Grenade attack, Jammu kashmir, Srinagar