मेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा!

मेहबुबांच्या स्वप्नांवर पाणी, राज्यपालांनी भंग केली विधानसभा!

पीडीपीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयावर टीका होतेय.

  • Share this:

श्रीनगर,ता. 21 नोव्हेंबर : जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी बुधवारी सायंकाळी विधानसभा भंग करण्याचा निर्णय घेतला. तसं पत्र राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आल. राज्यपालांच्या या निर्णयामुळं पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं गेलंय. पीडीपीने सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपालांनी हा निर्णय घेतल्याने त्यांच्या निर्णयावर टीका होतेय.


राज्यपाल राजवट असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये पीडीपी आणि काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करणार होते. आणि ओमर अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स त्यांना बाहेरून पाठिंबा देणार होता. मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपीने राज्यपाल सत्यपाल मलिक यांना पत्र लिहून 56 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही केला होता. त्यामुळं राज्यपाल आता कुठला निर्णय घेतात याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं.


भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढल्यानंतर मेहेबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून विधानसभा स्थगित ठेवण्यात आली आहे. या आधी भाजपने पीडीपीचे काही असंतुष्ट आमदार गळाला लागतात का याची चाचपणी केली होती. असा प्रयत्न करून सत्ता स्थापन करण्याची भाजपची योजना होती मात्र ती यशस्वी झाली नाही.


असं होतं संख्याबळ


- पीडीपी - 28

- काँग्रेस - 12

- एनसी - 15

........................................

- एकूण - 55

-----------------------------

- बहुमताचा आकडा - 44


 
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 21, 2018 09:27 PM IST

ताज्या बातम्या