मराठी बातम्या /बातम्या /देश /

शरद पवारांच्या पत्राचा परिणाम, नरेंद्र मोदी सरकारला घ्यावा लागला मोठा निर्णय

शरद पवारांच्या पत्राचा परिणाम, नरेंद्र मोदी सरकारला घ्यावा लागला मोठा निर्णय

निर्णयाला 7 महिने झाल्यानंतर आता त्यांची तातडीने सुटका करावी असं पत्र शरद पवार यांच्यासहीत  8 मान्यवरांनी पंतप्रधानांना लिहिलं होतं.

  • Published by:  Ajay Kautikwar
नवी दिल्ली 13 मार्च :  जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांची नजरकैदेतून सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अब्दुल्ला हे तब्बल 7 महिन्यांनंतर बाहेर येणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधून कलम 370 हटविल्यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या नेत्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलं होतं. राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक शांतता कायम राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता असं स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी दिलं होतं. निर्णयाला 7 महिने झाल्यानंतर आता त्यांची तातडीने सुटका करावी असं पत्र शरद पवार यांच्यासहीत  8 मान्यवरांनी पंतप्रधानांना लिहिलं होतं. पवारांच्या या पत्रानंतर केंद्राला हा मोठा निर्णय घ्यावा लागल्याचं बोललं जात आहे. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, मेहबुबा मुफ्ती यांच्यासहीत अनेक पक्षांचे नेते अटकेत होते. या नेत्यांच्या वक्तव्यांमुळे राज्यातली शांतता भंग होण्याची शक्यता व्यक्त केली गेली होती. मात्र या अटकेवर चौफेर टीका झाला. याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. त्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र स्थानिक प्रशासनाला खात्री पटल्यावरच ते या नेत्यांच्या सुटकेचा निर्णय घेतील असं अमित शहांनी स्पष्ट केलं होतं. या नेत्यांना दिर्घकाळ नजरकैदेत ठेवणं योग्य नाही. त्यांची तातडीने  सुटका करा. या नेत्यांच्या अटकेमुळे राज्यात जनतेच्या मनात चुकीचा संदेश जात आहे. ते देशाच्या विरोधात जातील. जे झालं ते झालं आता परिस्थिती सामान्य झाली पाहिजे असंही पवारांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं. हे वाचा -  ‘तमाशा’लाही बसला ‘कोरोना’चा फटका, बारी ठरवण्यासाठी गावपुढारी फिरकेना

'शिवज्योत'शिवनेरीवरून आणताना अपघात, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

‘कोरोना’चं थैमान, हे आहेत जगभरातले 50 Updates

First published:

Tags: Sharad pawar

पुढील बातम्या