370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालं मतदान; भाजपला किती जागा मिळाल्या पाहा

370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालं मतदान; भाजपला किती जागा मिळाल्या पाहा

जम्मू काश्मीरचा (Jammu and Kashmir) विशेष दर्जा (Article 370) काढून घेतल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या मतदानाचीटक्केवारी पाहिलीत तर महाराष्ट्रातल्या (Maharashtra Assembly election 2019) जनतेला लाजवणारं प्रमाण आहे.

  • Share this:

श्रीनगर, 25 ऑक्टोबर :  जम्मू काश्मीरचा (Jammu and Kashmir) विशेष दर्जा (Article 370) काढून घेतल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या मतदानाचा आकडा पाहिलात तर महाराष्ट्रातल्या (Maharashtra Assembly election 2019) जनतेला लाजवणारं प्रमाण आहे. 98 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान या राज्यात झालं. भाजप, काँग्रेस आणि स्थानिक पक्ष यामध्ये होते. पण सरशी झाली अपक्ष उमेदवारांची. भाजप आणि काँग्रेसला किती जागा मिळाल्या ते पाहण्यासाठी स्क्रोल करा.

5 ऑगस्टला जम्मू काश्मीरचं 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदाच राज्यात ब्लॉक डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकांना नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.  जम्मू काश्मीरचे मुख्य निवडणूक आयुक्त शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण 316 पैकी 280 ब्लॉक्ससाठी मतदान झालं. 27 ब्लॉकमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले.

निवडून आलेल्यांपैकी बहुतांश उमेदवार कुठल्याही मोठ्या स्थानिक किंवा राष्ट्रीय पक्षाचे प्रतिनिधी नाहीत. 217 उमेदवार अपक्ष आहेत. भाजपने 81 जागा जिंकल्या तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला. जम्मू काश्मीर पँथर्स पार्टीने एक जागा जिंकली.

 Maharashtra Election 2019: शिवसेना किंग होणार की किंगमेकर? मातोश्रीवर ठरणार नव्या सरकारचं भवितव्य

काश्मीर खोऱ्यात जिंकलेल्या 128 पैकी 18 उमेदवार भाजपचे आहेत आणि 1 काँग्रेसचा आहे. 109 उमेदवार अपक्ष आहेत.

काश्मीरमधले दोन्ही मोठे पक्ष PDP (पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी)आणि NC नॅशनल कॉन्फरन्स यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला होता. काँग्रेसनेही बहिष्काराची घोषणा केली होती. पण शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या 2 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी एकाचा अर्ज बाद झाला, तर दुसरा उमेदवार निवडून आला.

भाजप- शिवसेनेच्या वाटाघाटीत काय होणार? या आहेत 3 शक्यता

पंचायत राजच्या निवडणुका तीन टप्प्यांत होतात. पहिल्या टप्प्यातली निवडणूक मागच्या वर्षी झाली होती. त्यावरही नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीने बहिष्कार टाकला होता. ही निवडणूक कडक बंदोबस्तात पण शांततेत पार पडली.

ANALYSIS : विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडून काँग्रेसने घ्यावेत हे 3 धडे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 25, 2019 04:29 PM IST

ताज्या बातम्या