जम्मू काश्मीर : घरात दडून बसलेले 3 अतिरेकी ठार; सुरक्षा दलांची कारवाई; 1 भारतीय अधिकारी शहीद

जम्मू काश्मीर : घरात दडून बसलेले 3 अतिरेकी ठार; सुरक्षा दलांची कारवाई; 1 भारतीय अधिकारी शहीद

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम खोऱ्यातले अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात ही चकमक झाली. अतिरेक्यांच्या गोळीबारात एक भारतीय सैन्याधिकारी शहीद.

  • Share this:

श्रीनगर, 22 ऑक्टोबर : गेले काही दिवस संचारबंदीमुळे शांत असलेल्या जम्मू काश्मीरमधून मंगळवारी संध्याकाळी एका चकमकीची बातमी आली. काश्मीरच्या सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. अवंतीपुरा (Awantipora) भागात एका घरात हे अतिरेकी दडून बसले असल्याची माहिती पोलिसांना समजली. त्यांनी घराला वेढा दिला, तेव्हा अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. या चकमकीत अखेर 3 अतिरेक्यांना ठार करून सुरक्षा दलांनी त्यांच्याकडचा दारुगोळा जप्त केला आहे.

जम्मू काश्मीरच्या नौशेरा भागात मंगळवारी प्रत्यक्ष ताबारेषेजवळ Line of Control अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात ज्युनियर कमीशंड ऑफिसर (JCO) शहीद झाले. त्यानंतर या भागातील घरांमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तपासणी सुरू केली. तेव्हा एका घरात दडलेले अतिरेकी समोर आले. या चकमकीत ठार झालेल्या अतिरेक्यांपैकी दोघे पाकिस्तानी असल्याचं स्पष्ट झालं आहे. एक स्थानिक असल्याचं समजतं. संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू असल्याचं सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितलं.

रविवारी (20 ऑक्टोबर) भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये नीलम खोऱ्यातले अतिरेकी तळ उद्ध्वस्त केले होते. तंगधर सेक्टरमध्ये घुसखोरांना मदत करण्यासाठी पाक सैन्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतर भारतीय सेनेनं हा हल्ला केला आणि अतिरेकी तळांना लक्ष्य केलं.

संबंधित - भारताविरोधात मोठा कट रचतोय पाकिस्तान, LoCवर तैनात केले कमांडो - सूत्र

जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यात सोशल मीडिया, इंटरनेट यावर निर्बंध आले होते. काश्मीरच्या मुख्य नेत्यांवर सुरक्षा दलांची नजर होती आणि सीमेवर कडक पहारा होता. प्रसारमाध्यमांवरही निर्बंध असल्याने गेल्या काही काळात काश्मीर खोऱ्यातून अशांततेची बातमी आली नव्हती.

-------------------------------

अन्य बातम्या

अमेरिकन नागरिकासाठी टॅक्सी चालकानं केली दिल्ली बंद, लुटले 90 हजार!

पाकला कठोर शब्दांत ठणकावणारा गंभीर 6 वर्षीय मुलीसाठी झाला बजरंगी भाईजान!

VIDEO : भारत-पाक सीमेवर शत्रूला धडकी भरवणाऱ्या शस्त्रांचा युद्धाभ्यास

पाकिस्तानकडून गोळीबार; दोन जवान शहीद तर एक नागरिक ठार!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 22, 2019 09:05 PM IST

ताज्या बातम्या