काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक, 2 अतिरेक्यांचा खात्मा

काश्मीरमध्ये दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक, 2 अतिरेक्यांचा खात्मा

आज पहाटे काश्मिर खोऱ्यातील बिजबेहरामधील संगम येथे भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये एक चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

  • Share this:

बिजबेहरा, (काश्मीर), 22 फेब्रुवारी : सीमारेषेवर दहशवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. आज पहाटे काश्मिर खोऱ्यातील बिजबेहरामधील संगम येथे भारतीय जवान आणि अतिरेक्यांमध्ये एक चकमक झाली.  या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. बिजबेहरामधील संगम येथे ही चकमक सुरू झाली. यामध्ये 2 अतिरेक्यांचा खात्मा कऱण्यात आला आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेले दहशतवादी लष्कर-ए-ताएबा संघटनेचे होते. भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी अतिरेक्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत 2 अतिरेक्यांचा खात्मा केला आहे. दहशतवाद्यांकडून केला जाणारा हल्ल्याचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे.

भारतीय जवानांकडून या दहशतवाद्यांबाबत अधिक तपास सुरू आहे. दहशतवाद्यांनी नेमक्या कोणत्या हेतूने हा हल्ला केला हे पुढील तपासातून स्पष्ट होईल.

First published: February 22, 2020, 7:32 AM IST

ताज्या बातम्या