Home /News /national /

Jammu-Kashmir Encounter: शोपियानमध्ये चकमक सुरु, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं

Jammu-Kashmir Encounter: शोपियानमध्ये चकमक सुरु, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना घेरलं

जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) शोपियान जिल्ह्यात (Shopian district) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (security forces and militants) चकमक सुरू झाली आहे.

    श्रीनगर, 22 जानेवारी: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) शोपियान जिल्ह्यात (Shopian district) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (security forces and militants) चकमक सुरू झाली आहे. किलबाल भागात सुरू असलेल्या या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना घेरल्याचं वृत्त आहे. गुरुवारीच सुरक्षा दलांनी बडगाम जिल्ह्यातून (Budgam District) लष्कर-ए-तैयबाच्या (Lashkar-e-Taiba) एका दहशतवाद्याला अटक केली. नुकतंच इंटेलिजन्स ब्युरोनं प्रजासत्ताक दिनापूर्वी मोठ्या दहशतवादी कारवायांबाबत अलर्ट जारी केला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कर आणि अल-बद्र काश्मीरमध्ये दहशतवादी घटनांची योजना आखत असल्याचे सांगण्यात आले. तेव्हापासून परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काश्मीरशिवाय राजधानी दिल्लीतही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यापूर्वी अनुचित घटनेबाबत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जराही करु नका दुर्लक्ष... Omicron चं एक नवीन लक्षण आलं समोर सुरक्षा दलांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यातून लष्कर-ए-तैयबाच्या (LeT) दहशतवाद्याला अटक केली आणि त्याच्या ताब्यातून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सुरक्षा दलांना दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती, त्यानंतर सकाळी बडगामच्या चादूरा भागात शोध मोहीम सुरू करण्यात आली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाशी संबंधित सक्रिय दहशतवाद्याला पकडण्यात आले. जहांगीर अहमद नायकू असे त्याचे नाव असून तो शोपियानमधील मेमंदरचा रहिवासी आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. Corona चा नवा व्हेरिएंट?, Omicron च्या BA.2 चा कहर; स्ट्रेनचा तपास सुरु  दहशतवाद्याकडून गुन्हेगारी साहित्य, एक पिस्तूल, पिस्तूलची दोन मॅगझिन आणि पिस्तुलची 16 काडतुसे, शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या