पुलवामानंतर आता होतं कुलगाम लक्ष्य; सुरक्षा दलाच्या कारवाईत 2 दहशतवादी ठार

पुलवामानंतर आता होतं कुलगाम लक्ष्य; सुरक्षा दलाच्या कारवाईत 2 दहशतवादी ठार

दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे.

  • Share this:

कुलगाम, 30 मे : पुलवामानंतर आता पुन्हा जम्मू-काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती सुरू झाल्या आहेत. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं आहे. कुलगाम सेक्टरमध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती.

जवानांकडून सर्च ऑपरेशन सुरू झालं. त्यादरम्यान दहशतवाद्यांकडून गोळीबार चालू झाला. वानपोरा परिसरात दहशतवाद्यांनी जवानांवर भ्याडपणे गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनी चोख प्रत्युत्तर देत कारवाई केली. या कारवाईत दोन जण जागीच ठार झाले आहेत. सुरक्षा दलाकडून कुलगाम सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे.

संबंधित-पुन्हा पुलवामा होण्याचं थोडक्यात टळलं, गाडीमध्ये सापडली IED स्फोटकं

पुलवामा इथे लॉकडाऊनदरम्यान हिजबुलकडून 28 मे रोजी मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट उधळण्यात सुरक्षा दलाला मोठं यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलाच्या 30 गाड्या आणि 400 जवानांना लक्ष्य करण्यासाठी 10 किलो वजाने IED स्फोटकं भरलेली सॅन्ट्रो कार पुलवामामध्ये पाठवण्यात आली होती. या दहशतवादी कटाची माहिती पोलिसांनी आधीच मिळाल्यानं सुरक्षा दल आणि पोलीस सतर्क होते आणि त्यामुळे थोडक्या पुन्हा पुलवामा होण्याचं टळलं.

हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी हिदायतुल्ला मलिक हा त्या कारचा मालक असल्याचं स्पष्ट झालं आहे. कारमध्ये स्फोटकं भरून ती कार सुरक्षा दलाच्या ताफ्यावर धडकवायची असा त्या दहशतवाद्यांचा डाव होता. तो डाव फसला होता आणि मोठा घातपात टळला होता. आता NIA त्या कटाची पाळमुळए शोधून काढत आहे.

संबंधित-पर्दाफाश: IED स्फोटकांनी भरलेल्या त्या कारचा मालक हिजबुलचा दहशतवादी

संपादन- क्रांती कानेटकर

First published: May 30, 2020, 10:05 AM IST

ताज्या बातम्या