त्राल चकमकीत जवानांना मोठं यश, 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा

त्राल चकमकीत जवानांना मोठं यश, 3 दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू काश्मीरमधील त्राल जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

  • Share this:

श्रीनगर, 11 मार्च : दक्षिण काश्मीरमधील त्राल जिल्ह्यात रविवारी (10 मार्च)सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास त्रालमधील पिंगलिश गावामध्ये चकमक सुरू झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश मिळाले आहे.  चकमकीमुळे परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. कारवाईनंतर घटनास्थळावरून दहशतवाद्यांचे शव ताब्यात घेण्यात आले आहेत. यानंतर जवानांकडून घटनास्थळावर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, त्रालमधील पिंगलिश गावात दहशतवाद्यांची एक टोळी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला रविवारी (10 मार्च)संध्याकाळी मिळाली. यानंतर भारतीय सैन्याच्या 41 राष्ट्रीय रायफल, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीम सुरू केली.

इंटरनेट सेवा बंद

दहशतवादी लपलेल्या ठिकाणाला जवानांनी चहुबाजूंनी घेराव घालत, खबरदारी म्हणून परिसरातील इंटरनेट सेवा बंद केली. यादरम्यान, दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न जवानांनी हाणून पाडला. यानंतर चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सध्या परिसरात शोध मोहीम राबवली जात आहे.

पुलवामा हल्ला : जवानांची मोठी कारवाई, वाहनात स्फोटकं ठेवणारा दहशतवादी ठार

=============================================================================================

VIDEO : भाजपवरील जहरी टीकेनंतर गिरीश महाजनांनी दिलं राज ठाकरेंना आव्हान

First published: March 11, 2019, 7:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading