भारत-चीन सीमा संघर्षापाठोपाठ काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती, 2 जणांचा खात्मा

भारत-चीन सीमा संघर्षापाठोपाठ काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कुरापती, 2 जणांचा खात्मा

दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यासाठी परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलानं संयुक्त कारवाई केली.

  • Share this:

श्रीनगर, 25 जून : भारती-चीन लडाखमध्ये तणावाचं वातावरण असताना दुसरीकडे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांच्या कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. उत्तर काश्मीरमधील सोपोर भागातील हरदशिवा गावात गुरुवारी सकाळी भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

या गावात काही दहशतवादी घरांमध्ये लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या दहशतवाद्यांचा कट उधळून लावण्यासाठी परिसरात पोलीस आणि सुरक्षा दलानं संयुक्त कारवाई केली. या कारवाई दरम्यान दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबाराला सुरक्षा दलानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

हे वाचा-IndiaChinaBorderTension : 'ड्रॅगन'नं दिला धोका, लडाखच्या सीमेवर पुन्हा नवी खेळी

एकीकडे कोरोनाचे वाढते रुग्ण, लॉकडाऊनमुळे आलेलं आर्थिक संकट तर दुसरीकडे नेपाळ आणि चीन यांनी सुरू केलेले सीमा रेषेवरील वाद या सगळ्या संकटांसोबत पाकिस्तानकडून वारंवार होणारं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवादी कारवाया अशी अनेक आव्हानं मोदी सरकारसमोर आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात कारवाई आणि सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 25, 2020, 8:32 AM IST

ताज्या बातम्या