भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या JNU च्या शेहला रशीद यांच्या अटकेची मागणी

भारतीय लष्कराबद्दल वादग्रस्त ट्वीट करणाऱ्या JNU च्या शेहला रशीद यांच्या अटकेची मागणी

जम्मू - काश्मीरमध्येमध्ये भारतीय सैन्य स्थानिक लोकांवर कसे अत्याचार करत आहे, याच्या वादग्रस्त नोंदी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता शेहला रशीद यांना अटक करण्याच्या मागणीने जोर धरला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 19 ऑगस्ट : जम्मू - काश्मीरमध्येमध्ये (Jammu kashmir ) भारतीय सैन्य (Indian army) स्थानिक लोकांवर कसे अत्याचार करत आहे, याच्या वादग्रस्त नोंदी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता शेहला रशीद यांना अटक करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. शेहला रशीद या JNU च्या(जवाहरलाल नेहरू विद्यापीठ)माजी विद्यार्थिनी असून तिथल्या विद्यार्थी संघटनेचं उपाध्यक्षपदीही त्या होत्या. रशीद यांच्या 10 ट्वीट पोस्ट्सची दखल भारतीय लष्करानेही घेतली आहे आणि त्यांचे सगळे दावे खोडून काढले आहेत. मुद्दाम लोकांना भडकवण्याच्या उद्देशाने ही खोटी माहिती कुठलीही खातरजमा न करता पसरवली जात आहे, असं लष्कराने म्हटलं आहे.

शेहला रशीद यांनी भारतीय लष्कराबाबत केलेल्या या निराधार माहितीच्या ट्वीटमागचा हेतू अशांतता पसरवण्याचा असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुप्रीम कोर्टातले वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी केली आहे.

'ओमर अब्दुल्ला, रविश कुमार, स्वरा भास्कर, द वायर, शेहला रशीद, गुलाम नबी आझाद, रामचंद्र गुहा या सगळ्यांना पाकिस्तानातून फंड मिळतो, असं भाजपला वाटतं... नेमका किती पैसा आहे पाकिस्तानकडे?' असं शेहला रशीद यांनी ट्वीट केलं आहे.

त्याअगोदर 10 ट्वीट्सची मालिकाच त्यांनी पोस्ट केली. त्यामध्ये कलम 370 रद्द करण्याच्या घोषणेनंतर केंद्र सरकार आणि लष्कराने कशी दडपशाही सुरू केली आहे, याविषयी लिहिलं होतं.

-----------------------------------------------------------------------------

VIDEO: अशा प्रेमपत्रांची आम्हाला सवय, ईडीच्या नोटीसवर राज ठाकरेंच्या पत्नीचा सरकारला टोला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 04:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading