Home /News /national /

Jammu Kashmir election LIVE : भाजपची पहिल्यांदाच काश्मिरात मुसंडी, 'गुपकार गँग'ला शह

Jammu Kashmir election LIVE : भाजपची पहिल्यांदाच काश्मिरात मुसंडी, 'गुपकार गँग'ला शह

J&K DDC Election: कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदा निवडणुका झाल्या आणि त्यात काश्मीर खोऱ्यात भाजपने पहिल्यांदाच विजयी पताका फडकावली आहे. जम्मूमध्ये भाजप निर्विवाद आघाडी मिळवली आहे.

  श्रीनगर, 22 डिसेंबर : जम्मू काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या (J&K DDC Election Results 2020) निमित्ताने भारतीय जनता पक्षाने (BJP wins balhama )पहिल्यांदाच काश्मीर खोऱ्यात आपल्या विजयाची पताका फडकावली आहे. या निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पहिले कल हाती आले आहेत. त्यानुसार स्थानिक पक्षांच्या गुपकार आघाडीला (gupkar alliance) सर्वाधिक जागांवर आघाडी आहे. पण या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने  श्रीनगरमध्ये पहिला विजय मिळाला आहे. भाजपने काश्मीरमध्ये 'गुपकर गँग'ला शह दिल्याचं मानलं जात आहे. फारुख अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स (NC), मुफ्तींची पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी (PDP) आणि इतर 7 स्थानिक पक्ष मिळून या निवडणुकांसाठी गुपकर आघाडी स्थापन केली होती. ही आघाडी आत्तापर्यंतच्या निकालाच्या कलानुसार काश्मिरात आघाडीवर आहे. भारतीय जनता पक्षाने जम्मूमध्ये आघाडी घेतली आहे.  पण  श्रीनगर जिल्ह्यात भाजपने एक जागा खिशात घातली आहे.  एजाज हुसेन यांनी बलहामची जागा जिंकल्याने तिथे भाजपनं आपलं खातं उघडलं आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर आणि कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जिल्हा विकास परिषदेच्या (DDC) निवडणुका होत आहेत. आठ टप्प्यांमध्ये या निवडणुका पार पडल्या. आज या निवडणुकांचा निकाल हाती येतो आहे. DDC च्या  280 जागांसाठी 2178 उमेदवार रिंगणात होते. 28 नोव्हेंबरपासून 19 डिसेंबरपर्यंत मतदान पार पडलं. 57 लाख पात्र मतदारांपैकी 51 टक्के मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होत मत दिलं. दुपारी 1 वाजेपर्यंतची स्थिती अशी होती -

  एजाज हुसेन या भाजपच्या उमेदवाराने श्रीनगर जिल्ह्यातल्या बलहामा या जागेवर विजय नोंदवला आहे. भाजपचा खोऱ्यातला हा पहिला विजय आहे. केंद्रशासित प्रदेशातील 20 जिल्ह्यांपैकी प्रत्येक ठिकाणी 14 अशा 280 डीडीसी जागा आहेत. 28 नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या आठ टप्प्यांत मतदान झाले आणि 19 डिसेंबर रोजी मतदान झाले. 57 लाख मतदारांपैकी 51 टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यासह मुख्य प्रवाहातील काश्मीर-केंद्रित सात राजकीय पक्षांनी 'पीपल्स अलायन्स फॉर गुपकार डिक्लेरेशन' (पीएजीडी) च्या बॅनरखाली युती करून निवडणूक लढवली. अनुच्छेद 370 पुन्हा लागू करण्यासाठी केलेली ही युती आहे. 'गुपकर गँग'ला शह गुपकार समूह' हा माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती, फारूख अब्दुल्ला आणि सज्जाद लोन यांचा समावेश असलेला राजकीय पक्षसमूह आहे.  गुपकार आघआडीत एकूण 7 राजकीय पक्षांचा समावेश आहे. हा समूह जम्मू आणि काश्मीरला पूर्वीचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी लढणार आहे. जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्याचे कृत्य या समूहाला अमान्य असून ते घटनाविरोधी असल्याचं त्यांचं म्हणणे आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या गुपकार रोडवरील निवासस्थानी ही आघाडी सथापन करण्यासंबंधीची बैठक झाली होती.

  Published by:अरुंधती रानडे जोशी
  First published:

  Tags: BJP, Jammu kashmir

  पुढील बातम्या