सोपोरमध्ये CRPF ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद; गोळीबारात नागरिकाचाही मृत्यू

सोपोरमध्ये CRPF ताफ्यावर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद; गोळीबारात नागरिकाचाही मृत्यू

जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 01 जुलै : जम्मू-काश्मीर (Jammu-Kashmir) येथील सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) ताफ्यावर अतिरेक्यांनी हल्ला केला आहे. यात सीआरपीएफ 179 बटालियनचे एक जवान शहीद झाले असून, नागरिकाचादेखील गोळी लागल्यानं मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी गस्त घालणार्‍या CRPFच्या ताफ्यावर हल्ला केला.

वृत्तसंस्था ANIनं दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी CRPFची एक तुकडी गस्त घालण्यासाठी बाहेर गेली होती. या दरम्यान रेबन भागात CRPFच्या ताफ्यावर अचानक गोळीबार झाला. भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले, मात्र या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे. सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडीही घटनास्थळी पोहोचली आहे. संपूर्ण परिसर सील करण्यात आला असून शोध मोहीम राबविली जात आहे.

सुरक्षा दलावर गेल्या 6 दिवसात केलेला हा दुसरा हल्ला आहे. याआधी शुक्रवारी अनंतनाग येथील बिजबेहडा येथे CRPFच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात एक जवान शहीद झाले होते, तर 5 वर्षांच्या एका मुलाचा मृत्यू झाला होता.

एकीकडे CRPFच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर त्रल येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहेत. पुलवामा जिल्ह्यातील त्रल येथे दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यानंतर शोध मोहीम राबविली जात आहे.

First published: July 1, 2020, 9:32 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading