श्रीनगर, 06 मे : जम्मू-काश्मीरमध्ये सलग तिसऱ्यादिवशी दहशतवाद्यांच्या कुरघोड्या सुरूच आहेत. बुधवारी अवंतीपुरामधील शरसाली खुरे परिसरात काही दहशतवाद्यी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी ह्या माहितीच्या आधारे परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं. यादरम्यान लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर भ्याड हल्ला केला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार एक दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे तर आणखी तीन जण लपून बसल्याची माहिती मिळाली आहे.
याआधी रविवारी हंदवाडा इथे झालेल्या दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत कर्नल, मेजर यांच्यासह तीन जवान शहीद झाले होते. तर जवानांनी सर्ज ऑपरेशन यशस्वी करत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि बंधिस्त केलेल्या एका कुटुंबाची सुखरुप सुटका केली होती. दहशतवाद्यांच्या कुरापती दिवसेंदिवस सुरू आहेत. कधी शस्त्रसंधीचं उल्लंघन तर कधी घुसखोरी. एकीकडे काश्मीरमध्ये कोरोनाचं महासंकट आहे तर दुसरीकडे या कुरापती.
Jammu & Kashmir: An encounter started at Sharshali Khrew area of Awantipora last night. Police and security forces are carrying out the operation which is still underway. (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/PoDOysw60v
जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील पाखरपोरा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी या ग्रेनेड हल्ल्यात सीआरपीएफ जवान आणि पोलिसांसह सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. दाखल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबविण्यात आली.