वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त !

वीरप्पनचा खात्मा करणारा अधिकारी 'मिशन काश्मीर'साठी नियुक्त !

  • Share this:

श्रीनगर, 21 जून : जम्मू-काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागताच कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनसह अनेक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची 'मिशन काश्मीर'वर नियुक्ती करण्यात आली आहे.

छत्तीसगडचे अतिरिक्त मुख्य सचिव बीव्हीआर सुब्रमण्यम आणि माजी मुख्य सचिव, माजी आयपीएस अधिकारी विजयकुमार अशी या दोन अधिकाऱ्यांची नावं आहेत.

सुब्रमण्यम यांना जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन.एन. वोरा यांचे मुख्य सचिव तर विजयकुमार यांना राज्यपालांचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरमधील महबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळ्यानंतर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यपाल राजवटीला मंजुरी दिली आहे. खरंतर, भाजप आणि पीडीपीची युती तुटल्यानंतर इथं नवं सरकार येणं शक्य नसल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.

जम्मू काश्मीरमध्ये भाजप सत्तेतून बाहेर पडल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. पण या दरम्यान दुसऱ्या कोणतंही सरकार पीडीपीसोबत युती करण्यासाठी तयार नाही आहेत. त्याचबरोबर भारताच्या अन्य राज्यांप्रमाणे काश्मीरमध्ये राष्ट्रपती सरकार चालवू शकत नाही. त्यामुळे आता विद्यमान राज्यपाल एन.एन वोहरा हे जम्मू काश्मीरचं सरकार चालवणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2018 05:09 PM IST

ताज्या बातम्या