Home /News /national /

BSF जवानांनी पाकिस्तानचा कट उधळला, शस्त्रास्त्र पुरवणारा ड्रोन केला नष्ट

BSF जवानांनी पाकिस्तानचा कट उधळला, शस्त्रास्त्र पुरवणारा ड्रोन केला नष्ट

एकाच वेळी तीन वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करत आहे.

    श्रीनगर, 20 जून : देश एकावेळी अनेक आव्हानांना तोंड देत आहे. देशात कोरोनाचं थैमान सुरू असतानाच लडाखच्या गलवान खोऱ्यातील 15 जूनला झालेल्या संघर्षानं तणाव आहे. तर दुसरीकडे वारंवार पाकिस्तानच्या कुरघोडी सुरू आहेत. सातत्यानं शस्रसंधीचं उल्लंघन करत आहे. या सगळ्या पस्थितीचा फायदा पाकिस्तान घेत असल्याचं समोर आलं आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानचा छुपा डाव उधऴण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. पाकिस्तानकडून शस्त्रस्त्र आणि रसद पुरवणारा ड्रोन BSF जवानांनी उडवल्याची माहिती मिळाली आहे. शनिवारी पहाटे 5च्या आसपास सीमेवर कठुआच्या हिरानगर सेक्टर येथून ड्रोन उडताना दिसले. सीमेवर तैनात असलेल्या BSF जवानांनी तो ड्रोन उडवला. हल्ला झाल्यानंतर ड्रोन एका शेतात पडल्याची माहिती मिळाली. जवानांनी या ड्रोनचा शोध घेतल्यानंतर त्यामधून एक रायफल, मासिक, काडतुसं आणि ग्रेनेड आणि बॅटरी जप्त केल्या आहेत. हे वाचा-'जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही', हवाई दलाच्या प्रमुखांचा चीनला थेट इशारा पाकिस्तानकडून आलेल्या या ड्रोनमधील सामान सैन्य दलानं ताब्यात घेतलं असून पाकिस्ताना पुन्हा एकदा छुपा डाव उधळून लावण्यात जवानांना यश आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार अशा प्रकारचे ड्रोन हे सैनिकांची माहिती काढण्यासाठी किंवा नजर ठेवणं, शस्रांची रसद पुरवण्यासाठी वापरले जातात. ड्रोनमध्ये अली भाई नावासाठी एक चिठ्ठीही मिळाल्याचं सांगितलं जात आहे. हा सर्व साठा अली भाईपर्यंत पोहोचवला जाणार होता आणि तो जवानांन पकडून उद्ध्वस्त केला. हे वाचा-पंतप्रधान मोदींच्या बैठकीनंतर चीनचा मोठा दावा, 'गलवान खोरं आमचा भाग' संपादन- क्रांती कानेटकर
    First published:

    Tags: Imran khan, India china border, India pakistan news, Indian army, Indian army latest news, Jammu, Jammu kashmir news, Ladakh, PM narendra modi

    पुढील बातम्या