Jammu-Kashmir : बारामुल्ला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एका जवानाला वीरमरण

Jammu-Kashmir : बारामुल्ला चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा, एका जवानाला वीरमरण

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती पुन्हा सुरू, चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 21 ऑगस्ट : जम्मू-काश्मीरमध्ये बारामुल्ला परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. पण एका स्पेशल पोलीस ऑफिसरला(SPO)वीरमरण झाले असून आणखी एक जवान जखमी झाला आहे. या जवानावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

मंगळवारी (20 ऑगस्ट) संध्याकाळी सुरू झालेली ही चकमक बुधवारी सकाळी संपली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीदरम्यान दोन ते तीन दहशतवाद्यांना सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपनं घेराव घातला होता. यानंतर दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यामध्ये SPO बिलाल शहीद झाले. 5 ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्यात आलं. यादरम्यान कडेकोट सुरक्षाव्यवस्थेमध्ये काश्मीर खोऱ्यातील शांततेचं वातावरण होतं. पण आता पुन्हा पाकिस्ताननं कुरापती करण्यास सुरुवात केली आहे.

(वाचा : राजधानी दिल्लीत होणार दहशतवादी हल्ला, गुप्तहेर यंत्रणेच्या माहितीनंतर हाय अलर्ट)

दरम्यान, राजधानी दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ला होणार असल्याची माहिती गुप्तहेर खात्याकडून देण्यात आली आहे. शासकीय गाडीचा उपयोग करून दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण दिल्लीमध्ये मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली असून बॅरिकेड लावून वाहनांची तपासणी केली जात आहे.

(वाचा : उदनराजे आणि सुनील तटकरे पक्ष सोडण्याची चर्चा, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया)

जम्मू काश्मीरच्या मुद्यावरून 15 ऑगस्टला संपूर्ण दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली होती. तशीच सुरक्षा अद्यापही पाहायला मिळत आहे. 3 अफगाणी

दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली आहे. तेच दिल्लीतल्या महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करणार असल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांकडून देण्यात आली आहे. शासकीय वाहनांचा वापर करून दिल्लीमधल्या व्हीआयपी परिसरात, शासकीय वसाहतींमध्ये हल्ला घडवून आणण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सोमवारी गुप्तहेर यंत्रणांकडून यासंबंधी अलर्ट देण्यात आला. त्यानंतर संपूर्ण दिल्ली आणि सीमा भागांमध्ये मोठी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला किल्ल्यांचं स्वरुप आलं आहे. दरम्यान, भारतात घुसखोरी केलेल्या 3 अफगाणी दहशवाद्यांसारख्या दिसणाऱ्यांचा शोध घेण्याचं काम पोलीस यंत्रणेकडून सुरू आहे.

राज ठाकरेंच्या मदतीला दादूस आला धावून, पाहा काय म्हणाले उद्धव ठाकरे...

Published by: Akshay Shitole
First published: August 21, 2019, 1:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading