जवानांनी स्फोटकांनी घरच उडवलं, पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जवानांनी स्फोटकांनी घरच उडवलं, पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे.

  • Share this:

श्रीनगर, 14 जून : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. अवंतीपोरा परिसरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना शुक्रवारी (14 जून) मिळाली होती. यानंतर जवानांनी चहुबाजूंनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली.यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर ज्या घरात दहशतवादी लपून बसले होते, घरच स्फोटकांनी उडवलं. ठार झालेले दहशतवादी लष्कर-ए-तोयबा संघटनेची संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. 'News18 India' नं दिलेल्या वृत्तानुसार, ठार मारण्यात आलेला एक अतिरेकी गुरुवारीच (13 जून) दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता.

(पाहा :मुख्यमंत्रिपदासंदर्भात उदयनराजे भोसले यांची प्रतिक्रिया)

दरम्यान, यापूर्वी 12 जून रोजी CRPF जवानांवर अतिरेक्यांनी पुन्हा हल्ला केला. या आत्मघातकी हल्ल्यात 5 जवान शहीद झाले होते. अनंतनाग जवळच्या के.पी रोडवर हा हल्ला झाला होता.  पुलवामा हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा आत्मघाती हल्ला आहे. पेट्रोलिंगसाठी जवानांचं वाहन जात असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला. जवानांनीही या हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिलं. त्यात दोन दहशतवादी ठार झाले.  पुलमावा इथे 14 फेब्रुवारीला CRPF जवानांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते.

(पाहा : CCTV : मोठा अनर्थ टळला! खंडाळ्यात मोटरमनमुळे वाचला शेकडो प्रवाशांच्या जीव)

18 महिन्यांमध्ये 357 अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहीम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.

'ऑपरेशन ऑल आऊट'

'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहीम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं. त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

बंद खोलीत तरुणाला पट्ट्यानं अमानुष मारहाण, VIDEO व्हायरल

First published: June 14, 2019, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading