News18 Lokmat

अनंतनागमध्ये चकमकीत जवानांनी हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 09:11 AM IST

अनंतनागमध्ये चकमकीत जवानांनी हिजबुलच्या दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

श्रीनगर, 25 एप्रिल : सीमारेषेवर दहशवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी पहाटेदेखील जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आलं आहे. अनंतनागमधील बिजबेहरा येथे ही चकमक सुरू झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. आताही येथे चकमक सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठार करण्यात आलेले दहशतवादी हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे असल्याचं म्हटलं जात आहे. अफदार भट आणि बुरहान गणी अशी ठार करण्यातआलेल्या दशतवाद्यांची नावं आहेत. परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांना मिळाली होती. यानुसार शोधमोहीम राबवण्यात आली. यादरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सध्या जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून ऑपरेशन ऑलआऊट तीव्र स्वरुपात राबवण्यात येत आहे.SPECIAL REPORT : वाराणसीत मोदींच्या रॅलीला अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 08:00 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...