Jammu Kashmir : अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu Kashmir : अनंतनाग चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

Jammu Kashmir जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

  • Share this:

श्रीनगर, 8 जून : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सध्या दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. एकूण किती दहशतवादी घरात लपून बसले आहेत, याची ठोस माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र जवानांनी परिसराला चहुबाजूंनी घेराव घातला आहे. चकमक सुरू असल्यानं स्थानिकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अनंतनागमध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यादरम्यानच दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यास जवानांनीही सडेतोड प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं.

(वाचा : vपुलवामामध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा; रायफल घेऊन पळालेल्या दोन SPOचा देखील समावेश)







(वाचा : जम्मू काश्मीर : जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा)

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात गुरुवारी ( 6 जून ) ईद साजरी करण्यासाठी घरी  आलेल्या एका जवानाची संशयित दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली होती. अहमद बेग असं हत्या करण्यात आलेल्या जवानाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात बंदुकधारी गुरुवारी संध्याकाळी बेग यांच्या घरात घुसले आणि त्यांच्यावर गोळीबार केला. गंभीर स्वरूपात जखमी झालेल्या बेग यांनी जिल्हा रुग्णालयात तातडीनं आणलं गेलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. बेग शोपियां जिल्ह्यात आपलं कर्तव्य बजावत होते.

(वाचा :जम्मू आणि काश्मीरातल्या 'हवाई दला'च्या तळांवर हल्ल्याची शक्यता? सतर्कतेचे आदेश)

101 दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या पाच महिन्यात जवळपास 101 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये  76 स्थानिक दहशतवादी तर 25 परदेशी दहशतवाद्यांचा समावेश आहे. ठार करण्यात आलेले सर्वजण जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेतील असल्याची माहिती आहे.

SPECIAL REPORT: इथे मिळत आहे फक्त 10 रुपयांत साडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 8, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या