भारतीय सैन्याची मोठी कारवाई! 9 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

भारतीय सैन्याची मोठी कारवाई! 9 दहशतवाद्यांचा खात्मा; एक जवान शहीद

रविवारी केरन सेक्टरमध्ये 5 तर शनिवारी राजौरी सेक्टरमध्ये 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 05 एप्रिल : जम्मू-काश्मीरमध्ये एकीकडे कोरोनासोबत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे दहशतवादी आणि घुसखोरांच्या कुरघोडी दिवसेंदिवस वाढत आहेत. शुक्रवारपासून सातत्यानं भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकी सुरू आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 24 तासांत 9 दहशतवाद्यांचा खात्मा कऱण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. 24 तासांत ही मोठी कारवाई जवानांनी केली आहे. या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे तर दोन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या जखमी नागरिकांवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उत्तर काश्मीरमध्ये 5 घुसखोरांना कंठस्नान घालण्यात भारतीय सुरक्षा दलाल आज मोठं यश आलं. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे. त्याच दरम्यान दहशतवाद्यांनी मोठा घुसखोरीचा कट रचला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. मात्र जवानांनी हा कट आज उधळून लावत कारवाई केली. शनिवारी राजौरी परिसरात 4 दहशतवाद्यांना ठार करण्यात जवानांना यश आलं होतं.

हे वाचा-एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील 'या' शहराने रोखला कोरोना

रविवारी केरन सेक्टरमध्ये काही दहशतवादी उत्तर काश्मीरमधून येताना दिसले. यानंतर भारतीय सैनिकांनी गोळीबार सुरू केला, त्यात 5 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. या कारवाईत एका जवानाचा मृत्यू झाला आहे तर दोन नागरिक जखमी झाले आहेत. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून ज्या मार्गाने शस्त्रसंधीचं उल्लंघन केले आहे त्यामुळे काश्मीरमधील अनेक भागांमधील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. नागरिक, पोलीस आणि जवानांना कोरोना आणि दहशतवादी अशा दोन्ही महासंकटांचा सामना करावा लागत आहे.

हे वाचा-32 दिवसात भारतात असा पसरत गेला कोरोना, धक्कादायक आकडेवारी आली समोर

First published: April 5, 2020, 12:53 PM IST

ताज्या बातम्या