मराठी बातम्या /बातम्या /देश /

5 जवानांच्या शौर्याची गाथा, नागरिकांची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना झाले शहीद

5 जवानांच्या शौर्याची गाथा, नागरिकांची सुटका करण्यासाठी दहशतवाद्यांशी लढताना झाले शहीद

भ्याड हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, नागरिकांची सुखरुप सुटका.

भ्याड हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, नागरिकांची सुखरुप सुटका.

भ्याड हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा, नागरिकांची सुखरुप सुटका.

    श्रीनगर, 03 मे : जम्मू-काश्मीरमध्ये हंदवाडा परिसरात भारतीय सैन्यदल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये मेजर, कर्नल, पोलीस अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद झाले आहेत. हंदवाडा परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती शनिवारी मिळाली होती. त्यानंतर सर्च ऑपरेशन करत असताना दहशतवाद्यांनी तुफान गोळीबार सुरू केला. या भ्याड हल्ल्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र त्याच वेळी दु:ख बातमी म्हणजे आपल्या वीर 5 जवानांनी प्राण गमवले आहेत. जीवाची बाजी लावत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती समोर आली आहे. नागरिकांची सुटका कऱण्यासाठी आखली विशेष मोहीम हंदवाडा इथल्या चांजमुल्ला परिसरात दहशतवाद्यांनी काही नागरिकांना घरात बंदी बनवलं होतं. एका घरात त्यांना ठेवल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून सुरक्षा दलाला मिळाली होती. या नागरिकांची सुखरुप सुटका करण्यासाठी टीम रवाना झाली. त्यामध्ये 21 राष्ट्रीय राइफल्स यूनिटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल आशुतोष शर्मा, मेजर अनुज सूद, इतर जवानांचं पथक होतं. त्यांनी घराला घेरलं आणि कर्नल आणि मेजर यांनी घरात प्रवेश केला. दहशतवाद्यांचा गोळीबार सलग सुरूच होता. त्याला प्रत्युत्तर देत घरात बंदी बनवलेल्या नागरिकांची सुटका करण्यात त्यांना यश आलं मात्र नागरिकांची सुटका करताना मेजर सूद आणि कर्नल शर्मा यांना वीरमरण आलं. या रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान पोलीस अधिकारी आणि तीन जवानही शहीद झाले आहेत. या रेस्क्यू ऑपरेशनमदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात अधिकारी आणि जवानांना यश आलं आहे. हे वाचा-कुलभूषण जाधव यांना सोडवण्यासाठी पाकिस्तानशी बॅक-चॅनल चर्चा: हरीश साळवे शनिवारी भारतीय सुरक्षा दलाला काही दहशतवादी हंदवाडा येथे लपून बसल्याची असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांसह भारतीय सैनिकांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी चंजमुल्ला भागात तुफान गोळीबार सुरू केला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. त्यानंतर 5 जवान गायब असल्याची माहिती मिळाली. सैन्यदलानं या जवानांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याविषयी कोणतीही माहिती समोर आली नव्हती. रविवारी सकाळी चकमकीत शहीद झाल्याची माहिती भारतीय सैन्य दलाकडून मिळाली आहे. यामध्ये कर्नल, मेजर यांच्यासह 3 जवान आणि पोलीस अधिकाऱ्याचा सामावेश आहे. हे वाचा-मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोसळणार संकट, बंगालच्या उपसागरात घोंगावतय वादळ संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Indian army, Jammu and kashmir

    पुढील बातम्या