श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरुद्ध संयुक्त मोहिमेत 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. केलम भागात तीन ते चार दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती. दहशतवाद्यांविरोधातील या अभियानात लष्कर, पॅरा फोर्स, सीआरपीएफच्या पथकांचा समावेश होता.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा लष्कराला केलम भागात दहशतवादी घुसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर लष्कराने राखीव पोलिस दलाच्या मदतीने शोधमोहिम सुरू केली होती. ज्या ठिकाणी दहशतवादी लपले होते त्या ठिकाणाला घेरल्यानंतर सुरक्षादलाने जोरदार गोळीबार केला. या चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाच्या जवानांना यश आलं आहे. अद्याप याबाबत लष्कराकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
सकाळपासून सुरू झालेल्या या कारवाईत दोन घरांना रॉकेटने उद्ध्वस्त केलं. या चकमकीत मारण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असण्याची शक्यता आहे. यामुळे केलम भागातील सुरक्षा व्यवस्थाही कडक करण्यात आली आहे. याशिवाय भागातील इंटरनेट आणि रेल्वेसेवा बंद करण्यात आली आहे.
VIDEO : तब्बल 75 वर्षांनंतर 'हे' लढाऊ विमान घेणार फिनिक्स भरारी