Jammu-Kashmir: सुरक्षा दलांनी ठार केलेले हिज्बुलचे ‘ते’ दोन दहशतवादी Covide-19 पॉझिटिव्ह

Jammu-Kashmir: सुरक्षा दलांनी ठार केलेले हिज्बुलचे ‘ते’ दोन दहशतवादी Covide-19 पॉझिटिव्ह

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेले दहशतवादी हिजबुल संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एक दहशतवादी अली भाई उर्फ ​​हैदर हा परदेशी होता.

  • Share this:

श्रीनगर 5 जुलै: जम्मू आणि कश्मीरच्या (Jammu Kashmir)  कुलगाम (Kulgam) जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा दलांनी हिज्बुल मुजाहिद्दीनच्या (Hizbul Mujahideen) दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. या चकमकीत एक जवानही जखमी झाला होता. ठार केलेल्या त्या दोनही दहशतवाद्यांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट्स मिळाले असून त्यातून धक्कादाय माहिती पुढे आली आहे. ते दोनही दहशतवादी कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं आहे. या रिपोर्ट्स नंतर आता सुरक्षा दलांपुढे आता नवं संकट निर्माण झालं असून दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईच्या वेळी जास्त काळजी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

काश्मीरमधील कुलगाम सेक्टरमध्ये शनिवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चमकीत दोन हिजबुलचे दहशतवादी ठार झाले होते. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचारासाठी सुरू आहेत.

कुलगामध्ये दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत दोन जणांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आलं होतं.

...अन्यथा मला किडनी विकावी लागेल; अर्शद वारसीच्या त्या ट्विटमागे काय आहे कारण

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेले दहशतवादी हिजबुल संघटनेशी संबंधित होते. त्यापैकी एक दहशतवादी अली भाई उर्फ ​​हैदर हा परदेशी होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. चकमक झालेल्या ठिकाणाहून शस्त्रास्र आणि इतर सामान जप्त करण्यात आलं आहे.

कोरोनाचं संकट निर्माण झाल्यामुळे सुरक्षा दलांना दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईच्या वेळी काय काळजी घ्यावी याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहशतवाद्यांना अटक करताना किंवा चकमकीत ठार झाल्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची याविषयी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या असून त्याचं कडकपणे पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 5, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या