मराठी बातम्या /बातम्या /देश /J&K: सुरक्षा दलाला मोठं यश कुपवाडामध्ये दोघांचा खात्मा, 18 तासांमध्ये 7 अतिरेकी ठार

J&K: सुरक्षा दलाला मोठं यश कुपवाडामध्ये दोघांचा खात्मा, 18 तासांमध्ये 7 अतिरेकी ठार

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलानं जोरदार मोहीम उघडली आहे. कुपवाडामध्ये झालेल्या एन्काउन्टरमध्ये दोन आणखी दहशतवादी ठार झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलानं जोरदार मोहीम उघडली आहे. कुपवाडामध्ये झालेल्या एन्काउन्टरमध्ये दोन आणखी दहशतवादी ठार झाले आहेत.

जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलानं जोरदार मोहीम उघडली आहे. कुपवाडामध्ये झालेल्या एन्काउन्टरमध्ये दोन आणखी दहशतवादी ठार झाले आहेत.

मुंबई, 20 जून : जम्मू काश्मीरमधील (Jammu and Kashmir) दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलानं जोरदार मोहीम उघडली आहे. कुपवाडामध्ये झालेल्या एन्काउन्टरमध्ये दोन आणखी दहशतवादी ठार झाले आहेत. कुपवाडामध्ये आत्तापर्यंत 4 अतिरेक्यांना ठार मारण्यात सुरक्षा दलाला यश आलंय, रविवारी या भागात झालेल्या जोरदार गोळीबारात दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले होते.कुपवाडासह कुलगाम आणि पुलवामामध्येही चकमक झाली. 'प्रसार भारती'नं दिलेल्या वृत्तानुसार गेल्या 18 तासात 3 वेगवेगळ्या चकमकीमध्ये 7 दहशतवादी मारले गेले आहेत. यामध्ये लष्कर-ए-तोएबाचे 5 तर जैशच्या 2 दहशतवाद्यांचा समावेश आहे.

काश्मीर झोनच्या पोलिसांनी ट्विटर करत दिलेल्या माहितीनुसार कुपवाडा एन्काऊन्टरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाचं नाव शौक आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात दारूगोळा तसंच आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले आहे. या भागातील शोध मोहीम अद्याप सुरू आहे. कुपवाडामध्ये मारला गेलेला एक दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असून त्याचा संबंध लष्कर-ए-तोयबाशी होता, अशी माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'शौकत अहमद शेख या अटक करण्यात आलेल्या अतिरेक्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा दलानं कुपवाडामधील लोलाब परिसरात मोहीम सुरू केली होती. त्याचवेळी ही चकमक झाली. या भागात लपून बसलेल्या अतिरेक्यांनी पहिल्यांदा गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलानं दिलेल्या उत्तरात हे दोन्ही अतिरेकी मारले गेले.

'अग्निपथ'च्या विरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांनी उचललं हे पाऊल

दक्षिण काश्मीरमधील कुलगाममधील दामहाल हांजी भागात दुसरी चकमक झाली. या चकमकीत दोन अतिरेकी मारले गेले. यापैकी एक अतिरेकी लष्करचा तर दुसरा जैश ए मोहम्मदचा होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर पुलवामामधील चटपोरा भागात एक अतिरेकी मारला गेला असून त्याची ओळख पटवण्याचे काम अद्याप सुरू आहे.

First published:

Tags: Jammu kashmir, Terrorist