जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 12 मृत्युमुखी; 15 जखमी

जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळून 12 मृत्युमुखी; 15 जखमी

जम्मू काश्मीरच्या सुंदरबनी भागात एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला.

  • Share this:

श्रीनगर, 2 जानेवारी : जम्मू काश्मीरच्या सुंदरबनी भागात लांबेरी इथे एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात 12 जण मृत्युमुखी पडले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीर राज्यात राजौरी सेक्टरमध्ये हा अपघात झाला.

राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबनी इथल्या पर्वतीय प्रदेशात एका घाटातून जाताना ही बस दरीत कोसळली. पोलिसांनी सुरुवातीला 7 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं होतं. पण मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या अपघातात बसमधले 12 जण जागीच ठार झाले. 15 जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात पोहोचवण्यात आलं आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे.

-

अन्य बातम्या

नोकरी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकार सुटीबद्दलचा नियम बदलण्याची शक्यता

पण तुला मारायचं नव्हतं...! धारदार शस्त्रानं माय-लेकीवर केले सपासप वार

CDS बिपिन रावत यांच्या नावे बनावट पत्र होतेय Viral, लष्कराचा सतर्कतेचा इशारा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 2, 2020 03:50 PM IST

ताज्या बातम्या