Article 370 : भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा धक्का

Article 370 : भारताच्या निर्णयानंतर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठा धक्का

भारताच्या निर्णयाने हडबडलेल्या पाकिस्तानने मदतीसाठी विविध देशांचे दरवाजे ठोठावले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. भारताच्या या निर्णयाचे पडसाद जगभरात उमटले आहेत. काही देशांनी या निर्णयाचे बाजूने प्रतिक्रिया दिली आहे, तर काहींनी खुलेपणाने याबाबत भाष्य करणं टाळलं. पण भारताच्या निर्णयाने हडबडलेल्या पाकिस्तानने मदतीसाठी विविध देशांचे दरवाजे ठोठावले आहेत.

भारताच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानने सगळ्यात आधी मलेशिया आणि तुर्की या देशांकडे मदत मागितली. त्यासोबतत ऑर्गेनायझेशन ऑफ इस्लामिक कॉर्पोरेशनमध्ये पाकिस्ताने हा मुद्दा उपस्थित केला. पण सगळीकडूनच पाकिस्तानची निराशा झाली आहे.

कलम 370 रद्द केल्याच्या मुद्द्यावरून UAE ने थेट भारताच्या बाजू घेतली आहे तर मलेशियाने या मुद्द्यावर आमची नजर असेल, असं आश्वासन दिलं आहे. तसंच तुर्कीनेही केवळ लवकरच मदत करू, अशा आश्वासनावर पाकिस्तानची बोळवण केली आहे. त्यामुळे पाकिस्तान आणखीनच बॅकफूटवर गेला आहे.

भारताचा निर्णय आणि त्याचे परिणाम

जम्मू आणि काश्मीरमध्ये केंद्र सरकारने धाडसी निर्णय घेत राज्याला विशेष दर्जा देणारं घटनेतलं 370वं कलम हटवलं आहे. राज्याच्या इतिहासातला हा सर्वात मोठा निर्णय समजला जातोय. लडाख या पहाडी क्षेत्रालाही जम्मू आणि काश्मीरपासून वेगळं करत केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे.

370 कलम काढून घेतल्यानंतर काय फरक पडणार?

- आता सरळ केंद्र सरकार जम्मू काश्मीरचे कामकाज पाहणार

- केंद्र सरकार स्वतः विकासाचे प्रकल्प राबविणार

- राज्याचा दर्जा काढल्यामुळे दिल्ली राज्यसारखी सारखी परिस्थिती निर्माण होणार

- जमीन खरेदी, व्यवसाय करण्याचा अधिकार मिळणार

- भ्रष्टचाराला आळा बसेल असा सरकारचा दावा

- वेगळा झेंडा लावण्याचा अधिकार काढून घेण्यात आला

- उपराज्यपालाच्या माध्यमातून केंद्र सरकार काम करणार

सांगलीत गर्भवती महिलेचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 8, 2019 11:00 AM IST

ताज्या बातम्या