News18 Lokmat

'खुदा कसम, ... तर मोदींना तुरुंगात टाकेन'

मी तिकडे का जाऊ? मोदींनी भारतालाच पाकिस्तान बनवलं, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

News18 Lokmat | Updated On: Mar 28, 2019 12:11 PM IST

'खुदा कसम, ... तर मोदींना तुरुंगात टाकेन'

श्रीनगर, 28 मार्च : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते लोन यांच्यानंतर आणखी एका नेत्याने वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. माजी आमदार जावेद अहमद राणा यांनी पूंछ येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपशब्द काढले.जावेद राणा म्हणाले की, खुदा कसम, मी या देशाच्या पंतप्रधानांविरुद्ध जम्मू आणि काश्मीरसह देशात जितके खून झालेत त्या सगळ्यांचा गुन्हा दाखल करेन.

एका सभेत बोलताना राणा म्हणाले की, जेव्हा मला पाकिस्तानला कधी जाणार असे विचारले तेव्हा मी सांगितलं की पाकिस्तानला कशाला जायला हवं. मोदींनी भारतालाच पाकिस्तान केलं आहे. मोदींनी देशात इतके खून, लूट आणि द्वेष पसरवला आहे की भारताचा पाकिस्तान झाला आहे.

Loading...

दहशतवादाचा अर्थ कोणी मला विचारला तर मी मोदी असं उत्तर देईन असंही जावेद राणा यांनी म्हटलं होतं. याआधी पक्षाचे वरिष्ठ नेते मोहम्मद अकबर लोन यांनी कुपवाडातील एका सभेवेळी विधानसभेत पाकिस्तान जिंदाबादचा नारा देईन असं म्हटलं होतं.

VIDEO: पार्थ पवारांना झाला उशीर, पाहा काय केलं


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 28, 2019 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...