जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू, ब्रिटनच्या NSAची अजित डोवाल यांच्याशी चर्चा

जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू, ब्रिटनच्या NSAची अजित डोवाल यांच्याशी चर्चा

जम्मूमधील ग्रेनेड हल्ल्यात 27 जण जखमी

  • Share this:

श्रीनगर,7 मार्च : जम्मूमधील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 27 जण जखमी झाले आहेत. ग्रेनेड हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतले आहे. या हल्ल्यामागे दहशतवादी संघटना असल्याचा हात संशय व्यक्त केला जात आहे.

यानंतर ब्रिटनचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांच्यासोबत संपर्क साधला. दहशतवादाविरोधातील लढाईमध्ये सोबत असल्याचे यावेळेस त्यांनी डोवाल यांना सांगितले.

14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये अलर्ट जारी करण्यात आला होता. यादरम्यान, जम्मूमध्ये वर्दळीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असतानाही हा ग्रेनेड हल्ला करण्यात आला. यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

जम्मूतील बस स्थानक परिसरात गेल्या 10 महिन्यात झालेला हा तिसरा मोठा हल्ला आहे. 24 मे 2018 रोजी देखील या स्थानकाजवळ हल्ला झाला होता. या हल्ल्यात दोन पोलीस कर्मचारी आणि एक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाला होता. यानंतर 29 डिसेंबर 2018 रोजी सुद्धा बस स्थानक परिसरात स्फोट झाला होता. सुदैवान यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

VIDEO : राज्यात लोकसभा-विधानसभा एकत्र? पाहा काय म्हणतात राजकीय विश्लेषक

First published: March 7, 2019, 3:43 PM IST
Tags: Jammu

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading