मराठी बातम्या /बातम्या /देश /

जम्मूमध्ये 'जैश-ए'च्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईचा LIVE VIDEO

जम्मूमध्ये 'जैश-ए'च्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा, सुरक्षा दलानं केलेल्या कारवाईचा LIVE VIDEO

 पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नगरोटा परिसरात बन टोल प्लाझाजवळ काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.

पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नगरोटा परिसरात बन टोल प्लाझाजवळ काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.

पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नगरोटा परिसरात बन टोल प्लाझाजवळ काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.

  • Published by:  Kranti Kanetkar
श्रीनगर, 19 नोव्हेंबर : दहशतवाद्यांच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाही. जम्मू-काश्मीरच्या नगरोटा भागात गुरुवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू झाली. पहाटे 5 च्या सुमारास जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील नगरोटा येथील बन परिसरातील टोल प्लाझाजवळ या चकमकीला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. या टोल नाक्याजवळ तुफान गोळीबार सुरू झाला. सांभा सेक्टरमधून बुधवारी रात्री 10 वाजता दहशतवादी नगरोटा इथे येत असताना पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास टोल नाक्याजवळ सुरक्षा दलानं त्यांना गाठून त्यांच्यावर कारवाई करणार त्याचवेळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. हे 4 ही दहशतवादी जैश ए मोहम्मदचे असल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे दहशतवादी मोठा कट तयार करत होता. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा देखील असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे सुरक्षा दलानं तातडीनं कारवाई करत त्यांना टोल नाक्याजवळ गाठलं आणि पहाटे 5 च्या सुमारास चकमक सुरू झाली. हे वाचा-42 वर्षांपूर्वी चोरी झालेल्या राम, लक्ष्मण, सीतेच्या मूर्ती भारताला मिळाल्या जम्मू जिल्हा पोलीस प्रमुख एसएसपी श्रीधर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसाप पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास नगरोटा परिसरात बन टोल प्लाझाजवळ काही दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. दहशवादी एका कारमध्ये लपून बसले होते. सुरक्षेच्या दृष्टीनं पोलीस आणि सुरक्षा दलानं नगरोटा राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. सुरक्षा दला आणि पोलीसांनी ही कारवाई केली असून त्यामध्ये 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आल्याची माहिती मिळाली आहे.
First published:

Tags: Indian army, Jammu and kashmir

पुढील बातम्या