Home /News /national /

कफ सिरप ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 9 मुलांचा मृत्यू

कफ सिरप ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 9 मुलांचा मृत्यू

9 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर कफ सिरपवर 8 राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

    श्रीनगर, 21 फेब्रुवारी : खोकला झाला की आपण सहज माहीत असलेलं कफ सिरप घेतो किंवा बऱ्याचवेळा खोकल्यावर डॉक्टर आपल्याला कफ सिरप देतात. हेच कफ सिरप 9 मुलांच्या जीवावर बेतल आहे. औषध घेतल्यामुळे 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. जम्मूच्या उधमपूर परिसरात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर 8 राज्यांमध्ये या कफ सिरपच्या विक्रीवर बंद घालण्यात आली आहे. कोल्डबेस्ट पीसी असं या कफ सिरपचं नाव आहे. हे औषध खोकला असलेल्या मुलांना देण्यात आलं होतं. त्यानंतर 9 मुलांचा मृत्यू झाला त्यावेळी या औषधात विषारी द्रव्य असल्याचं आढळून आलं. जम्मू इथल्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांच्या मृत्यू 2019 डिसेंबर ते जानेवारी 2020 दरम्यान झाला आहे. या सर्व 9 मुलांचा मृत्यू या औषधामुळे झाल्याचं समजल्यानंतर 8 राज्यांमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली आहे. या 8 राज्यात पोहोचलेल्या औषधाच्या बाटल्या परत मागवण्यात आल्या असून त्या जम्मूजवळच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ इंटीग्रेटीव मेडिसिन इथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आल्या आहेत. हे औषध सिरप सिरमौर जिल्ह्यातील तयार होतं. कोल्ड बेस्ट पीसी कफ सिरप हे औषध हिमाचल प्रदेशमधील डिजिटल व्हिजन नावाची कंपनी तयार करते. चंदीगड इथल्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कफ सिरपमुळेच 9 मुलांचा मृत्यू झाला आहे. या कफ सिरपमध्ये Diethylene Glycol या विषारी पदार्थ आढळला आहे. जो हानीकारक आहे. त्यामुळे आता पुढे काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हेही वाचा-डोळे दाखवा आणि पेमेंट करा, अशी असेल देशाची नवी पेमेंट सिस्टम हेही वाचा-वारिसला पठाण यांना '15 कोटीं'च वक्तव्य भोवलं, ओवेसींनी केली मोठी कारवाई हेही वाचा-एसटी बसच्या धडकेत जीपचा चुराडा, 5 जणांचा जागीच मृत्यू
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या