मराठी बातम्या /बातम्या /देश /Breaking News: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत Blast, सुरक्षा वाढवली

Breaking News: पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी जम्मूत Blast, सुरक्षा वाढवली

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज (24 एप्रिल) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज (24 एप्रिल) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज (24 एप्रिल) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)दौऱ्यावर आहेत.

जम्मू, 24 एप्रिल: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज (24 एप्रिल) जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir)दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यापूर्वी जम्मूच्या बिश्नाह (Bishnah area ) येथे एका शेतात स्फोट (blast) झाल्याची माहिती समोर आली आहे.

लल्यान भागात (Lalyan area) असलेल्या एका शेतात हा स्फोट झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM.narendra Modi) पल्ली, सांबा (Samba) येथे पंचायत परिषदेला संबोधित करणार आहेत. ही घटना त्या स्थळापासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

मोदींच्या जम्मू दौऱ्याची सुरक्षा आढावा, दहशतवादी चकमकीनंतर सैनिकांची अतिरिक्त तैनाती

जम्मू शहराच्या बाहेरील सुंजवान येथे दहशतवादी चकमक झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याचा नवीन सुरक्षा आढावा घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली अधिक सुरक्षित करण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. ही रॅली बहुस्तरीय सुरक्षा घेराखाली काढण्यात येणार आहे. गुप्तचर यंत्रणेचा आणखी विस्तार करण्यात आला आहे. पाकिस्तानच्या सीमेत ड्रोन घुसण्याची शक्यता नाहीशी करण्यासाठीही कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. रॅलीत एक लाख लोक सहभागी व्हावेत यासाठी प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात येत आहे.

रॅलीच्या सुरक्षेशी संबंधित अधिकार्‍यांनी सांगितलं की, सांबा आणि आसपासच्या परिसरात पूर्ण सुरक्षेअंतर्गत बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमाचे ठिकाण सध्या सामान्य लोकांसाठी मर्यादित आहे. कार्यक्रमस्थळाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर चौक्या वाढवण्यात आल्या आहेत. महामार्ग आणि त्याच्या लगतच्या रस्त्यांवरील वाहने आणि लोकांना कसून तपासणी केल्यानंतरच पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे.

पंतप्रधान मोदींचा आजचा दौरा

जम्मूतील (Jammu) सांबा जिल्ह्यात (Samba district) होणाऱ्या पंचायती राज दिनाच्या कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत. त्यांच्या या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलं असून राजकीय अर्थही काढले जात आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत बोलताना ते प्रथम ग्रामसभेच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यादरम्यान देशभरातील ग्रामसभांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. पंतप्रधान हजारो पंचायतींच्या प्रतिनिधींशी संवाद साधणार आहे. त्यांच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या देशातील सर्व पंचायतींचाही गौरव करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

काय असेल कार्यक्रम?

या व्यतिरिक्त 38,082 कोटी रुपयांच्या औद्योगिक विकास प्रस्तावांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यादरम्यान पंतप्रधान 2 जलविद्युत प्रकल्पाची पायाभरणी करतील आणि त्यासोबत जम्मू-श्रीनगर बोगद्याचे उद्घाटनही करतील. दुबईहून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत मोदी विशेष बैठक घेणार असल्याचीही बातमी आहे. पुढील विकास योजनांबाबत चर्चा करण्यासाठी ते एमआर ग्रुप, डीपी वर्ल्डच्या प्रतिनिधींची भेट घेणार आहेत.

First published:
top videos

    Tags: Bomb Blast, Jammu and kashmir, Pm modi