लष्काराने दिला मोठा दणका, भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे  2 सैनिक ठार

लष्काराने दिला मोठा दणका, भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे  2 सैनिक ठार

शस्त्रसंधीचं उल्लंघन करत दहशतवादी भारतात घुसविण्याचा पाकिस्तानचा डाव असतो. भारताने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 5 जुलै: जम्मू आणि काश्मीरमधल्या सीमेवर पाकिस्तान कायम शस्त्रसंधीचं उल्लंघन करत असतो. आजही पाकिस्तानने गोळीबार केला. त्याला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झालेत. तर तीन जण जखमी झालेत. भारतीय लष्कराच्या कारवाईत पाकव्याप्त काश्मीरमधल्या निकियाल सेक्टरमध्ये या दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर रखचकरी , देवा आणि बागसार भागात तीन सैनिक जखमी झालेत.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्याने या भागात शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे. त्यामुळे भारतालाही त्याला उत्तर द्यावं लागतं. या कारवाईत पाकिस्तानला मोठं नुकसान सोसावं लागत आहे.

दोन्ही देशाच्या लष्करी अधिकाऱ्यांची याावर अनेदा चर्चा झाली आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन करायचं नाही असं ठरलेलं असतानाही पाकिस्तान कायम या नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळून आलं आहे.

शस्त्रसंधीचं उल्लंघन करत दहशतवादी भारतात घुसविण्याचा पाकिस्तानचा डाव असतो. याची माहिती आता भारतीय लष्कराला असल्याने भारताने पाकिस्तानचे हे प्रयत्न हाणून पाडले आहेत.

या गोळीबाराचं मोठं नुकसान दोन्ही बाजुंच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांना सोसावं लागतं. त्यांची जीवीत आणि वित्त हानीही मोठ्या प्रमाणावर होते.

मात्र पाकिस्तान आडमुठी भूमिका घेत असल्याने भारतही सडेतोड उत्तर देत असल्याने पाकिस्तानला दणका बसला आहे. पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश लष्कराला देण्यात आले आहेत.

संपादन - अजय कौटिकवार

First published: July 5, 2020, 11:01 PM IST
Tags: india

ताज्या बातम्या