S M L

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या चकमकीत 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

Updated On: Sep 13, 2018 11:26 PM IST

जम्मू-काश्मीरमध्ये जवानांच्या चकमकीत 8 पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-कश्मीर, 13 सप्टेंबर : बारामुल्ला जिल्ह्यात सोपोर भागात गुरुवारी सीमा सुरक्षा दलांच्या जवानांच्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात दहशतवादी घुसल्याची माहिती गुप्तचर खात्याने दिली होती. त्यानंतर जवानांनी धडक कारवाई करून दहशतवाद्यांचा खात्मा केला.तसंच जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत आणखी सहा दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय.

गावात लपलेल्या या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. त्यानंतर जवानांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. चिंकीपोरा आॅपरेशन म्हणून जवानांनी ही कारवाई केली. ती यशस्वी झाल्याचं सैन्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

याआधी जम्मूच्या झज्जर कोटली परिसरात दहशतवाद्यांसोबत चकमक झाली होती. दहशतवाद्यांनी एका फाॅरेस्ट गार्ड आणि सीआरपीएफच्या जवानाची गोळ्या झाडून हत्या केली. या तिन्ही दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी जवानांनी सर्च आॅपरेशन केलं. हल्ल्यानंतर दहशतवादी झज्जर कोटली क्षेत्रातून पळून गेले होते.

आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राहणाऱ्या स्थानिक गावकऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी तीन दहशतवादी हे घरात घुसले होते. बुधवारी संध्याकाळी 8 वाजता हे तिन्ही दहशतवादी शस्त्रासह घरात घुसले होते. त्यांनी आम्हाला कुणाला काही न सांगण्याची धमकी दिली होती. दहशतवाद्यांनी आम्हाला सांगितलं की, ते गेल्या पाच दिवसांपासून उपाशी होते. त्यांनी घरातील बिस्कीटचे पुडे आणि सफरचंद घेतली आणि घरातून निघून गेले.

Loading...
Loading...

तर जम्मूच्या पुंछ सेक्टरमध्ये सीमारेषेला पार करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आली. या घुसखोराची ओळख उमीर युसफ (23) अशी आहे. तो पाकिस्तान व्याप्त काश्मीर भागातला रहिवाशी आहे. जवानांनी त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 13, 2018 09:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close