LOC वरून ग्राउंड रिपोर्ट : रहिवासी म्हणतात, अशी स्थिती तर १९६५ च्या युद्धातही अनुभवली नव्हती

LOC वरून ग्राउंड रिपोर्ट : रहिवासी म्हणतात, अशी स्थिती तर १९६५ च्या युद्धातही अनुभवली नव्हती

हाजी गुलाम अब्बास हे काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात मेंढर क्षेत्रातल्या चाडला गावात राहतात. २३ फेब्रुवारीच्या रात्री अचानक भीतीदायक आवाजाने त्यांना जाग आली. त्यांच्या गावात सीमेपलीकडून बेछूट गोळीबार सुरू होता.

  • Share this:

श्रीनगर, ४ मार्च : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधल्या नियंत्रणरेषेवरच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या गोळीबारामुळए इथल्या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

हाजी गुलाम अब्बास हे काश्मीरमधल्या पूँछ जिल्ह्यात मेंढर क्षेत्रातल्या चाडला गावात राहतात. २३ फेब्रुवारीच्या रात्री अचानक भीतीदायक आवाजाने त्यांना जाग आली. त्यांच्या गावात सीमेपलीकडून बेछूट गोळीबार सुरू होता.

खरंतर ५० वर्षांत ते अशा स्थितीला तोंड देत आलेत पण २३ फेब्रुवारीच्या रात्री जो गोळीबार झाला त्यानंतर मृत्यूच आपल्या घराभोवती घिरट्या घालतोय, असं त्यांना वाटतंय. इतकी भयानक स्थिती तर १९६५ आणि १९७१ च्या युद्धातही अनुभली नव्हती, असं ते सांगतात.

हाजी गुलाम अब्बास यांच्या मेंढर गावाप्रमाणेच नियंत्रण रेषेच्या  आरएसपुरा, अर्निया, रामगढ, हिरानगर, कचानक, पर्गवल या गावांमध्येही हीच स्थिती आहे. याठिकाणच्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करते आहे. पण तरीही आपली कामंधंद्याची जागा सोडून दुसरीकडे जायला लोक तयार नाहीत.

नियंत्रण रेषेजवळच्या शाळा अनेक दिवसांपासून बंद आहेत. इथल्या बाजारपेठा ठप्प आहेत आणि कामकाजही बंद आहे. याठिकाणी राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम सुरू आहे. सीमेवरची एकेक गावं रिकामी केली जातायत.

काश्मीरमधल्या पुलवामा हल्ल्यानंतर या भागात पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जातोय. नियंत्रण रेषेचं उल्लंघन करून पाकिस्तानच्या सैन्याचा गोळीबार होतोय. या गोळीबारात भारतीय जवानांसोबतच तिथल्या रहिवाशांचाही बळी गेलाय. या गोळीबारामुळे तिथे राहणाऱ्या लोकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. मृत्यूची टांगती तलवार घेऊन जगायचं कसं, असा प्रश्न इथले गावकरी विचारतायत.

First published: March 4, 2019, 4:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading