काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 2 जवान शहीद

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत 2 जवान शहीद

नौशेरा इथे झालेल्या चकमकीत 2 जवान शहीद झाले आहेत.

  • Share this:

श्रीनगर, 01 जानेवारी: नव्या वर्षाचा जल्लोष आणि उत्साह देशभरात साजरा केला जात असतानाच दुसरीकडे नौशेरा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे. सर्च ऑपरेशन दरम्यान दोन जवान शहीद झाले आहेत. अजूनही नौशेरा सेक्टरमध्ये सर्च ऑपरेशन सुरू आहे. आजपासून जम्मू काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. एका बाजूला नव्या वर्षाचा उत्साह आणि नव्या वर्षानिमित्तानं जम्मू -काश्मीरमध्ये पुन्हा इंटरनेट सेवा सुरू होताच वाईट बातमी आली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांनी खारी थरयाट जंगलात घुसखोरी करून कब्जा केला होता. पाकव्याप्त काश्मीरमधून ते भारताच्या हद्दीत घोसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. याची माहिती जवानांना मिळताच सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. त्यावेळी झालेल्या चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत. अजूनही सर्च ऑपरेशन जारी असल्याची माहिती  जनसंपर्क अधिकारी लेफ्टिनेंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरला (Jammu-Kashmir) सरकारने 'न्यू ईयर गिफ्ट' दिले आहे. काश्मीर खोऱ्यात मंगळवारी मध्यरात्रीपासून SMS सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व शाळा, महाविद्यालये आणि हॉस्पिटल्समध्ये इंटरनेट सेवा (Internet Service) सुरू करण्यात आली आहे. 5 ऑगस्टला कलम 370 (आर्टिकल 370) हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात लॅंडलाइन, इंटरनेट आणि शॉर्ट मेसेज सर्व्हिस (एसएमएस) बंद करण्यात आली होती. दरम्यान, परिस्थिती सामान्य झाल्यानंतर हळूहळू काही भागातील प्रतिबंध हटवण्यात आले होते. आता नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये SMS आणि इंटरनेट सर्व्हिसही सुरू करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2020 09:56 AM IST

ताज्या बातम्या