Home /News /national /

काश्मीरमध्ये हिमस्खलनात 3 जवान शहीद, एकजण बेपत्ता

काश्मीरमध्ये हिमस्खलनात 3 जवान शहीद, एकजण बेपत्ता

गेल्या दोन दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये हिमवादळाचा कहर वाढत आहे.

    कुपवाडा, 14 जानेवारी : गेल्या 48 तासांपासून जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवादळ सुरू आहे. यामुळे उत्तर काश्मीरमधील अनेक भागात हिमस्खलन झालं आहे. कुपवाड्यात हिमस्खलनात दबल्याने तीन जवान शहीद झाले असून एक जवान बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या 48 तासांत बर्फवृष्टी होत असून कुपवाडासह काही ठिकाणी हिमस्खलन झालं आहे. कुपवाडा इथल्या माच्छिल सेक्टरमध्ये बर्फाच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याने तीन जवान शहीद झाले तर एक जवान बेपत्ता आहे. हिमस्खलन झालेल्या भागात लष्कराने बचावकार्य सुरू केलं आहे. अनेक जवानांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याचीही माहिती देण्यात आली आहे. कुपवाड्याशिवाय बांदीपोरा, गांदरबल इथंही हिमस्खलन झालं आहे. यामुळे अनेक घरं बर्फाखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत पाच जणांना वाचवण्यात आलं आहे. गुरेजमधील दासी बक्तुर इथं तीन घरं बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबली आहेत. गांदरबल जिल्ह्याला हिमवादळाचा तजाखा बसला आहे. बचावकार्य सुरू असून बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेतला जात आहे. रविवारी सकाळी पावसामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं होतं. तसेच रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूकही मंदावली होती. CAA : नागरिकत्व कायद्याला 'या' राज्य सरकारने दिलं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Heavy snowfall, Jammu and kashmir, Kupvada

    पुढील बातम्या