News18 Lokmat

काश्मीरात धडक कारवाई, सुरक्षा दलाला सापडला दहशतवाद्यांचा गुप्त शस्त्रसाठा

काडतूसं, रायफल्स, ग्रेनेड, पिस्तुलं असा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलानं हस्तगत केला. हा शस्त्रसाठा पाहून सुरक्षा दलालाही आश्चर्य वाटलं.

News18 Lokmat | Updated On: Jul 22, 2019 07:16 PM IST

काश्मीरात धडक कारवाई, सुरक्षा दलाला सापडला दहशतवाद्यांचा गुप्त शस्त्रसाठा

श्रीनगर 22 जुलै : जम्मू आणि काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी राबवलेल्या धडक अभियानाला मोठं यश आलंय. सुरक्षा दलाने मनधान जंगलात राबवलेल्या शोध मोहिमेत दहशतवाद्यांचं मोठं घबाड सापडलं. दाट जंगलात जमिनीखाली खोल दडवून ठेवलेला शस्त्रसाठा शोधण्यात पोलिसांना यश आलं. हा शस्त्रसाठा पाहून सुरक्षा दलालाही आश्चर्य वाटलं. काडतूसं, रायफल्स, ग्रेनेड, पिस्तुलं असा मोठा शस्त्रसाठा सुरक्षा दलानं हस्तगत केला.

Chandrayaan-2: दक्षिण ध्रुवावरच का जातोय आपण? ISRO करणार डार्क साइडचं रहस्यभेद!

जम्मू आणि काश्मीरमध्ये लष्कराची दहशतवाद्यांविरुद्ध आक्रमक मोहीम सुरू आहे. गेल्या 18 महिन्यांमध्ये तब्बल 357 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलंय अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. गेल्या सहा महिन्यांममध्ये पाकिस्तानने 1170 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. लष्कराने दहशतवाद्यांविरुद्ध सर्वच स्तरांमधून मोहिम सुरू केलीय. धडक कारवाई करणं, लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं आणि दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणं अशा प्रत्येक पातळीवर ही मोहिम सुरू आहे.

देशातल्या या मोठ्या सरकारी बँकेत नोकरीची संधी, असा करा अर्ज

'ऑपरेशन ऑल आऊट'

Loading...

'ऑपरेशन ऑल आऊट' असं नाव या मोहिमेला देण्यात आलंय. गेल्या दोन वर्षांपासून लष्कराची ही मोहिम सुरू आहे. याच कारवाईत 20 जणांना अटकही करण्यात आली असून त्यांच्याकडून महत्त्वाची माहिती मिळी आहे. या मोहिमेत लष्कराने दहशतवाद्यांची एक हिट लिस्ट तयार केलीय. या यादीतल्या दहशतवाद्यांचा माग घेऊन त्यांना ठार केलं जातं किंवा अटक केली जाते. हे दहशतवादी काही घातपात घडविण्याच्या आधीच त्यांना संपवलं जातं.

सोनभद्र हत्याकांड : 10 जणांच्या खूनाचा VIDEO पहिल्यांदाच आला समोर

त्यांनी घातपात घडविल्यावर शोध घेण्यापेक्षा आधीच आक्रमक धोरण स्वीकारलं तर मोठी हानी टाळली जाते असं लष्कराचं मत आहे. पुलवामा हल्ल्याला जबाबदार असलेल्या आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वांना लष्कराने कारवाई करत महिनाभरातच यमसदनी पाठवलं होतं. लष्कर ही यादी सातत्याने अपडेटही करत असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2019 07:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...