Pulwama : काश्मीरमधील 'हा' महामार्ग ठरतोय जवानांसाठीचा मृत्यूमार्ग

Pulwama : काश्मीरमधील 'हा' महामार्ग ठरतोय जवानांसाठीचा मृत्यूमार्ग

2014नंतर मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही पण...

  • Share this:

जम्मू, 16 फेब्रुवारी: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा इथं सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर हल्ल्यासंदर्भातील अनेक गोष्टी समोर येत आहेत. त्यातील एक सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जम्मू्-काश्मीरमधील हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा एकदा जवानांसाठी धोक्याचा ठरला आहे.

2013पासून ते आतापर्यंत  दहशतवाद्यांनी जवानांवर 11 मोठे हल्ले केले आहेत. यात 58 जवान शहीद झाले आहेत. या 11 हल्ल्यांपैकी अधिकतर हल्ले श्रीनगर-दक्षिण काश्मीर महामार्गावर झाले आहेत. त्यात 58 ते 56 जवान शहीद झाले आहेत. 2013मध्ये दहशतवाद्यांनी रोड ओपनिंग पार्टी  (ROP)वर हल्ला गेला होता. या हल्ल्यात CRPFचा एक जवान शहीद झाला होता. त्यानंतर पुलवामामध्ये एका ROPवर झालेल्या हल्ल्यात CRPFचा जवान शहीद झाला  होता.

जम्मू-काश्मीर राष्ट्रीय महामार्गावर 2014नंतर मोठा दहशतवादी हल्ला झाला नाही. मात्र 2015मध्ये राष्ट्रीय महामार्गावर 3 दहशतवादी हल्ले झाले. ज्यात सीमा सुरक्षा दल (BSF)चा एक जवान आणि CRPFचे दोन जवान शहीद जाले होते. हे हल्ले पंपोर आणि बिजबेहरा येथे झाले होते.  2016 हे सुरक्षा दलांसाठी अत्यंत खराब ठरले. 2016मध्ये  महामार्गावर 4 मोठे हल्ले झाले. या हल्ल्यात मिळून 13 जवान शहीद झाले. यात CRPFचे 10 तर बीएसएफचे 3 जवान होते. 2016मध्ये या मार्गावर सर्वात मोठा हल्ला 25 जून रोजी झाला. पंपोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात 8 जवान शहीद झाले.

2017मध्ये या राष्ट्रीय महामार्गावर एकच मोठा हल्ला झाला. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भक्तांच्या गाड्यांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात जवान शहीद झाले नाही. मात्र 7 प्रवाशांचा मृत्यू झाला होता.  त्यानतंर  14 जुलै 2018 रोजी दहशतवाद्यांनी उधमपूर येथे राष्ट्रीय महामार्गावर बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला. यात सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले होते. तर अन्य 11 जण जखमी झाले होते.

First published: February 16, 2019, 12:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading