Home /News /national /

जम्मू काश्मीर: पूंछमध्ये 7 दिवसात 9 जवान शहीद, उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू

जम्मू काश्मीर: पूंछमध्ये 7 दिवसात 9 जवान शहीद, उपचारादरम्यान दोन जवानांचा मृत्यू

पूंछमध्ये (Poonch) दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारपासून एकूण चार जवान शहीद झाले आहेत.

    श्रीनगर, 15 ऑक्टोबर: जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पूंछमध्ये (Poonch) दहशतवाद्यांसोबत सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारपासून एकूण चार जवान शहीद झाले आहेत. जखमी झालेल्या दोन रायफलमन याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. जम्मू सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांविरोधातील कारवाई अजूनही सुरू आहे. दरम्यान त्यातच आता वृत्त समोर येत आहे की, जवान दोन्ही सैनिकांचे पार्थिव आणण्यासाठी सावधगिरीनं पुढे जात आहे. असंही म्हटलं जात आहे की, जंगल भागात दहशतवादी असल्यानं परिस्थिती अधिक कठिण झाली आहे. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबारही केला आहे. गुरुवारी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. हेही वाचा- मुंबई लोकल संदर्भातली मोठी अपडेट, आता 'या' लोकांनाही प्रवासाची मुभा NDTVच्या अहवालात सूत्रांच्या हवाल्यानं सांगण्यात आलं आहे की, शहीद जवानांचे मृतदेह परत आणण्यासाठी लष्कर काळजीपूर्वक जंगलात पुढे पुढे सरकत आहेत. पुंछ भागात सोमवारपासून चकमक सुरू आहे. यादरम्यान गुरुवारी दोन जवान शहीद झाले. नुकत्याच घडलेल्या घटनेनंतर आता या आठवड्यात शहीद झालेल्या जवानांची संख्या 9 वर पोहोचली आहे. यामध्ये दोन कनिष्ठ कमिशन अधिकाऱ्यांचा समावेश आहे. रायफलमन विक्रम सिंह नेगी आणि योगंबर सिंह यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नाव न छापण्याच्या अटीवर एक पोलीस म्हणाला, "मृतदेह बाहेर काढले जात आहेत. हे काम लवकरच पूर्ण होईल. रिपोर्टनुसार, सूत्रांनी सांगितलं की, मृतदेह बाहेर काढण्याचं काम सकाळीच सुरू झालं होतं. खबरदारी म्हणून पुंछ-जम्मू महामार्ग बंद करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितलं की, सशस्त्र दहशतवादी मोठ्या संख्येनं जंगलात आहेत आणि अशा परिस्थितीत त्यांचा खात्मा करण्याचं काम खूप कठीण असल्याचं म्हटलं जात आहे. पुंछला जाणारा रस्ता बंद पुंछ जिल्ह्यातील (Poonch District) मेंढरच्या भटाधुडिया भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भींबर गली ते पूंछ हा रस्ता बंद करण्यात आला. सोमवारी पूंछमध्ये 5 जवान शहीद झाले यापूर्वी सोमवारी पूंछमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, ज्यात जेसीओसह पाच सैनिक शहीद झाले होते. गुप्तचर माहिती मिळताच सुरक्षा दलाची तुकडी दहशतवाद्यांच्या शोधात ऑपरेशनसाठी पीर पंजालच्या जंगलात गेली होती, तिथे दहशतवाद्यांनी घातपात घडवून आणत जवानांवर हल्ला केला, ज्यात 5 जवान शहीद झाले. हेही वाचा- प्रेयसीला भेटण्यासाठी संपूर्ण गावाची करायचा बत्ती गूल; रंगेहाथ पकडून गावकऱ्यांनी केली भयंकर अवस्था अन् शेवटी...  केंद्रशासित प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यानंतर लष्कर दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे. अलीकडेच पुंछ जिल्ह्यात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाई केली, ज्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चामेर जंगलात पोहोचले होते. गुप्त माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद झाले. या जवानांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये नायब सुभेदार (जेसीओ) जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग, शिपाई गजान सिंग, सराज सिंह आणि वैशाख एच यांचा समावेश होता.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terrorist attack

    पुढील बातम्या