Kashmir : दहशतवाद्यांनी केली 5 बंगाली मजुरांची हत्या, बिगर काश्मिरी लक्ष्य

Kashmir : दहशतवाद्यांनी केली 5 बंगाली मजुरांची हत्या, बिगर काश्मिरी लक्ष्य

बिगर काश्मीरी लोकांनी राज्यात येऊ नये म्हणून दहशतवाद्यांनी हा भ्याड हल्ला केलाय.

  • Share this:

श्रीनगर 29 ऑक्टोंबर : जम्मू आणि काश्मीरमधलं 370 कलम हटविल्याच्या घटनेला आता तीन महिने पूर्ण होताहेत. गेल्या दोन महिन्यांपर्यंत सरकारने राज्यात अतिशय कडक निर्बंध लादले होते. त्यामुळे हिंसाचाराच्या घटना घडल्या नव्हत्या. आता निर्बंध शिधील केल्यानंतर अतिरेकी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येतेय. कुलगाव जिल्ह्यात दहशतवाद्यांनी मंगळवारी 5 मजुरांची हत्या केली. हे सर्व मजूर पश्चिम बंगालचे नागरिक होते. गैर काश्मिरी लोकांनी राज्यात येऊ नये यासाठी ही हत्या केल्याचं बोललं जातंय. हे सर्व मजूर पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद  जिल्ह्यातले रहिवासी होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी ते काश्मीरमध्ये आले होते. मजुरी करायची आणि पोट भरायचं असं त्याचं काम होतं. शेतात मजूर म्हणून किंवा कुठल्या हॉटेल किंवा दुकानात ते काम करत होते.

भाजप आक्रमक, मुख्यमंत्री नाही तर शिवसेनेसोबत फक्त उपमुख्यमंत्रिपदावर चर्चा

370 कलम हटविल्यानंतर देशातल्या इतर राज्यातल्या लोकांनाही आता काश्मीरमध्ये जमीन घेण्याचा अधिकार मिळाला. आतापर्यंत बिगर काश्मिरी लोकांना या राज्यात जमीन घेता येत नव्हती. त्यामुळे दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवादी असं कृत्य करत असल्याचं सुरक्षा दलाने म्हटलं आहे.

पंतप्रधानांचे विश्वासू अधिकारी काश्मीरमध्ये

मोदी सरकारने काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर आता काश्मीरबद्दल एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. IAS अधिकारी गिरीश चंद्र मुरमु यांची जम्मू-काश्मीरचे पहिले लेफ्टनंट गव्हर्नर म्हणून नेमणूक झालीय. याबरोबरच राधाकृष्ण माथुर लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर झाले आहेत.

बहिण भावाला ओवाळत असतानाच घराच्या अंगणात 'बर्निग कार'चा थरार

काश्मीरमधलं कलम 370 रद्द करण्याबरोबरच काश्मीरचं विभाजन करण्यात आलं होतं. काश्मीर आणि लडाख हे केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले. आता दोन्हीकडे लेफ्टनंट गव्हर्नरची नेमणूक झाली आहे. याआधी जम्मू काश्मीरचे राज्यपाल असलेले सत्यपाल मलिक यांची गोव्याचे गव्हर्नर म्हणून नेमणूक झाली.

गुजरातमधले अधिकारी

गिरीशचंद्र मुरमु हे 1985 च्या बॅचचे गुजरात केडरचे अधिकारी आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ते मुख्य सचिव होते. जम्मू- काश्मीर आणि लडाख हे 31 ऑक्टोबरपासून केंद्रशासित प्रदेश म्हणून अस्तित्वात येणार आहेत. या लेफ्टनंट गव्हर्नरचा शपथविधीही त्याच दिवशी होणार आहे.

भाजपचे 75 आमदार शिवसेनेच्या संपर्कात? काय म्हणाले संजय राऊत!

जम्मू -काश्मीर केंद्रशासित प्रदेश बनल्यानंतर इथल्या कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती आणि पोलीस दलावर लेफ्टनंट गव्हर्नरच्या माध्यमातून केंद्राचं थेट नियंत्रण असेल. त्याचवेळी तिथलं प्रशासन निवडून आलेल्या सरकारच्या अंतर्गत असेल. 31 ऑक्टोबरनंतर काश्मीरमध्ये हा मोठा बदल होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 11:01 PM IST

ताज्या बातम्या