श्रीनगर 13 ऑक्टोबर: PDPच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांची तब्बल वर्षभरानंतर सरकारने नजरकैदेतून मुक्तता केली आहे. जम्मू आणि काश्मीरमधून 370वं कलम हटविल्यानंतर इतर नेत्यांसोबतच मेहबुबा मुफ्ती यांना सरकारने ताब्यात घेऊन श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवलं होतं. तेव्हापासून त्या नजरकैदेतच होत्या. सामाजिक शांतता बिघडू नये यासाठी हा निर्णय घेतल्याचं सरकारने सांगितले होते. मुफ्ती यांच्यासोबतच ओमर आणि फारूख अब्दुल्ला यांनाही सरकारने ताब्यात घेतलं होतं. काही महिन्यांपूर्वीच त्यांचीही सुटका करण्यात आली होती.
गेल्या वर्षी 5 ऑगस्टला सरकारने 370वं कलम हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्यानंतर जम्मू आणि काश्मीरला केंद्रशासीत प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. या निर्णयावरून देशभर वादळ निर्माण झालं होतं. जम्मू आणि काश्मीर सरकारचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी ही माहिती दिली.
या निर्णयानंतर केंद्राने राष्ट्रीय सुरक्षा आणि सामाजिक शांतता याचं कारण देऊन काश्मीरमधल्या प्रमुख नेत्यांना स्थानबद्द केलं होतं. राज्यातली परिस्थिती बिघडू नये यासाठी हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर राज्यात विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. राज्यातली शांतता बिघडावी म्हणून पाकिस्तानही प्रयत्न करत होता.
पाकिस्तान आगीत तेल ओतण्याचं काम करत असल्याने सरकारने विशेष खबरदारी घेत होतं. राज्यातली इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आली होती. नंतर काही दिवस मोर्चे आणि निदर्शनेही झाली. मात्र काही महिन्यांतच परिस्थिती नियंत्रणात आली होती.
Jammu and Kashmir: PDP chief Mehbooba Mufti is being released from detention, says J-K Administration Spokesperson Rohit Kansal pic.twitter.com/ssCyFdT1xl
— ANI (@ANI) October 13, 2020
सरकारने राज्याच्या विकासासाठी अनेक योजनाही जाहीर केल्या होत्या. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यांपासून कोविडचं संकट आल्याने लॉकडाऊन लावण्यात आला होता. परिस्थितीत सुधारणात होत असल्याचं पाहून सरकारने नेत्यांच्या मुक्ततेलाही सुरुवात केली होती. त्याच टप्प्यात मेहबुबा या महत्त्वाच्या नेत्या होत्या.