Indian Armyने पाकिस्तानला शिकवला धडा; 3 चौक्यांसह मोठा शस्त्रसाठा केला नष्ट

Indian Armyने पाकिस्तानला शिकवला धडा; 3 चौक्यांसह मोठा शस्त्रसाठा केला नष्ट

पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या कुरापतींना भारताने गुरुवारी चोख उत्तर दिले आहे.

  • Share this:

पुंछ, 10 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीर(Jammu-Kashmir)मधील पुंछ(Poonch) सेक्टरमध्ये पाकिस्तान(Pakistan)कडून सातत्याने गोळीबार केला जाता आहे. पाककडून होणाऱ्या या शस्त्रसंधी (ceasefire) उल्लंघनाला भारतीय लष्करा(Indian Army)ने जोरदार उत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तान(Pakistani army)कडून पुंछ जिल्ह्यातील देगबार सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. भारताने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 3 चौक्या नष्ट झाल्या. तसेच या कारवाईत पाकिस्तानचा एक जवान ठार जाला तर अन्य 7 जण जखमी झाले. पाकिस्तानकडून गेल्या 3 दिवसांपासून सातत्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला जात आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील पुंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार केला जात आहे. पाकिस्तान भारतीय चौक्यांवर गोळीबार करत होत. भारताने पाकिस्तानच्या प्रत्येक गोळीळी जशास तसे उत्तर दिले आहे. गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून पुन्हा एकदा मोठा प्रमाणात गोळीबार करण्यात आला. त्यावर भारतीय जवावांनी पाकिस्तानच्या चिरकुट सेक्टरमधील बरोह येथील 3 चौक्या नष्ट केल्या. भारताच्या या कारवाईत पाकिस्तानच्या एका जवानाचा मृत्यू झाला तर अन्य 7 जण जखमी झाले.

भारताने पाकिस्तानच्या फक्त चौक्या नष्ट केल्या नाहीत र बरोह सेक्टरमध्ये ठेवण्यात आलेला शस्त्रसाठ्याची चौकी देखील नष्ट केली. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या या कुरापतींना भारताने गुरुवारी चोख उत्तर दिले आहे.

VIDEO: 'राजीनामा द्यायला जिगर लागतं'; उदयनराजेंकडून विरोधकांचा समाचार

Published by: Akshay Shitole
First published: October 10, 2019, 12:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading