काश्मीरबाबत असा आहे पाकिस्तानचा गेमप्लॅन; पण, भारतीय लष्करापुढे दहशतवादी नरमले

काश्मीरबाबत असा आहे पाकिस्तानचा गेमप्लॅन; पण, भारतीय लष्करापुढे दहशतवादी नरमले

Terror Attack In Jammu and Kashmir : जम्मू - काश्नीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढवण्यामागे दहशतवाद्यांचा गेम प्लॅन आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, नीतिश कुमार, 21 जून : काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवाद्यांची घुसखोरी वाढत आहे. त्याला भारतीय जवानांकडून देखील जशास तसे उत्तर दिलं जात आहे. भारतीय लष्करानं बुरहान वाणीचा खात्मा केल्यानंतर घाटीमध्ये सध्या अशांत वातावरण आहे, दहशतवाद्यांची घुसखोरी दिवसेंदिवस वाढत आहे. हेच वातावरण कायम राहावेत यासाठी दहतवाद्यांच्या म्होरक्यांचा प्रयत्न आहे. शिवाय, बुरहान वाणी सारखा आणखी एखादा दहशतवादी हवा अशी इच्छा या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची आहे. तसंच वाढते दहशतवादी हल्ले हे सुरक्षा दलांना अधिक भडकवण्यासाठी केले जात आहेत. त्यामुळे घाटीमध्ये अशांतता वाढेल असा दहशतवाद्यांचा प्लॅन आहे.

मुद्दा तापवण्याचा प्लॅन

वाढत्या दहशतवादी कारवायांवर आता भारतीय लष्कराकडून देखील कारवाई केली जात आहे. याला हिंसा असं रूप देऊन हा मुद्दा मानवधिकार आणि सुरक्षा राष्ट्र संघटनेमध्ये उचलला जाऊ शकतो असा दहशतवाद्यांचा प्लॅन आहे. यापूर्वी बुरहान वाणीचा मुद्दा पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांनी संयुक्त राष्ट्र संघात उचलला होता.

सिद्धू राजकारण सोडा, मोहालीत लागले पोस्टर्स

भारतीय लष्करामुळे प्लॅन फेल

दरम्यान, भारतीय लष्कर सतर्क आहे. त्यामुळे दहशतवाद्यांच्या अनेक प्लॅनवर आत्तापर्यंत पाणी फेरलं आहे. शिवाय, नागरिक आणि सुरक्षा दलांमध्ये अद्याप कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. ज्याची चर्चा सर्वत्र होईल. शिवाय, दगडफेक रोखण्यामध्ये देखील भारतीय लष्कर यशस्वी झालं आहे.

भारतीय लष्कराचं लक्ष विचलित करण्यासाठी दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यांवर हल्ला करण्याचा प्लॅन आखला. पण, त्याला देखील यश येताना दिसत नाही. ऑपरेशन ऑल आऊटद्वारे भारतीय लष्करानं आतापर्यंत शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

VIDEO: बिचुकलेसारख्या लोकांना चपलेनं मारलं पाहिजे, मेघा धाडे संतापली

First published: June 21, 2019, 4:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading