पाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर

रविवारी दुपारी पाकिस्तानचं एक हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आढळून आलं. सीमा सुरक्षा दलानं त्या हेलिकॉप्टरला पिटाळून लावलं.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2018 04:17 PM IST

पाकिस्तानची मुजोरी कायम, भारताच्या हद्दीत घुसलं हेलिकॉप्टर

श्रीनगर, ता. 30 सप्टेंबर : पाकिस्तानने पुन्हा एकदा नियंत्रण रेषेचं उल्लंघन केलं. रविवारी दुपारी पाकिस्तानचं एक हेलिकॉप्टर जम्मू आणि काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात आढळून आलं. भारतीय सीमेच्या आत पांढऱ्या रंगाचं हे हेलिकॉप्टर दुपारी 12.13 वाजता आढळून आलं. हेलिकॉप्टर आढळून येताच लष्कराने हेलिकॉप्टरवर जोरदार गोळीबार केला. त्यानंतर ते तातडीनं माघारी फिरलं. घुसखोरांसाठी हा प्रदेश संवेदनशील असल्यानं पाकचा दुष्ट हेतू पुन्हा एकदा उघड झालाय.

या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झालाय. त्यात हे पांढऱ्या रंगाचं हेलिकॉप्टर दिसून येतं. गोळीबाराच्या आवाजानंतर हेलिकॉप्टर परत गेल्याचंही या व्हिडीओत स्पष्ट होतं. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. काही दिवसांपूर्वीच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांची हत्या झाल्याने दोन्ही देशामध्ये तणाव निर्माण झालाय.

हे हेलिकॉप्टर रेकी करण्यासाठी भारतीय हद्दीत आलं असलं पाहिजे अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिलीय. हा परिसर घुसखोरीसाठी कुप्रसिद्ध आहे. हिवाळ्याच्या आधी घुसखोरांना भारतात पाठवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. हिवाळ्यात हिमवर्षाव सुरू झाल्यानंतर घुसखोरांना भारतीय हद्दीत घुसणं अशक्य असतं.

दोन्ही देशांदरम्यान 1991 मध्ये एक करार झाला होता. त्यानुसार सीमेजवळ कुठली विमानं आणि हेलिकॉप्टर आणि किती जवळ येवू शकतात याची नियमावली ठरली होती. त्या नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही भारताने केला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल

Loading...

संयुक्त राष्ट्राच्या महासभेत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला.  पाकिस्तानमधून पसरणारा दहशतवाद भारतासाठी धोकादायक आहे.  9/11 चा मास्टरमाईंड मारला गेला, मात्र 26/11 चा मास्टरमाईंड अजूनही उघडपणे फिरतोय, भारताला आव्हानं देतोय अशी टीका सुषमा स्वराज यांनी केली.

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी शनिवारी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत भाषण केलं. त्यांनी नेहमी प्रमाणे हिंदीतून भाषण केलं.स्वराज यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला चांगलेच खडेबोल सुनावले.

अमेरिकेवर झालेल्या 9/11 च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मारला गेला, मात्र मुंबईवर झालेल्या  26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड अजूनही उघडपणे फिरतोय आणि भारताला आव्हानं देतोय.  हाफिज सईद सारखा दहशतवादी आजही पाकिस्तानात उजळ माथ्याने फिरतोय. त्यावर पाकिस्तान काहीही कारवाई करत नाही असा घणाघात सुषमा स्वराज यांनी केला.

Exclusive: पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल' म्हणते...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2018 04:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...