पूंछमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद

पूंछमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, एक जवान शहीद

  • Share this:

श्रीनगर, 24 मार्च : जम्मू काश्मीरमधील पूंछ जिल्ह्यात कुरापती पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले. नियंत्रण रेषेजवळ करण्यात आलेल्या गोळीबाराला सडेतोड प्रत्युत्तर देत असताना एक जवान शहीद झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यात शाहपूर आणि केरनी परिसरात शनिवारी संध्याकाळी जवळपास 5.30 वाजण्याच्या सुमारास सीमारेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू झाला. रात्रभर पाकिस्तानकडून तुफान गोळीबार सुरू होता. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्ताननं भारतीय लष्कराच्या चौक्या आणि गावांना टार्गेट केलं.  अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास  गोळीबारादरम्यान एक जवान गंभीर स्वरुपात जखमी झाला. यानंतर त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. गेल्या चार दिवसांमध्ये दोन जवान शहीद झाले आहेत.

दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानातील संबंध अधिक ताणले गेले आहेत. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे.

वाचा अन्य बातम्या

VIDEO: बारामतीतून उमेदवारी मिळाल्यानंतर कांचन कुल यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापुरात नाट्यमय घडामोडी, जयंत पाटलांच्या बैठकीला काँग्रेसचा मोठा नेता अनुपस्थित

पंकजा मुंडेंची खेळी, विनायक मेटेंना धक्का

VIDEO: लपलेल्या दहशतवाद्यांना लष्करानं घरासहीत उडवलं

First published: March 24, 2019, 12:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading