Home /News /national /

मानलं या उपराज्यपालांना! रुग्णांच्या सेवेसाठी दिलं ‘राजभवना’चं हेलिकॉप्टर

मानलं या उपराज्यपालांना! रुग्णांच्या सेवेसाठी दिलं ‘राजभवना’चं हेलिकॉप्टर

काश्मीरमध्ये अजुनही दुर्गम भागातून जलदपणे शहरात येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. दारिद्ररेषेखालच्या गरीब नागरिकांसाठी ही सेवा पुरवली जाणार आहे.

    श्रीनगर 16 ऑक्टोबर: जम्मू आणि काश्मीरचे उप राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या दुर्गम भागात राहणाऱ्या रुग्णांसाठी राजभवनाचं हेलिकॉप्टर वापरासाठी देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत हे हेलिकॉप्टर रुग्णांना नि:शुल्क दिलं जाणार आहे. या निर्णयामुळे जम्मू आणि काश्मीरमधल्या दुर्गम भागतल्या रुग्णांना फायदा होणार आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला. काश्मीरमध्ये अजुनही दुर्गम भागातून जलदपणे शहरात येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही. त्यामुळे रुग्णांचे हाल होतात. अशा रुग्णांना दिलासा देण्यासाठी राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. दारिद्ररेषेखालच्या गरीब नागरिकांसाठी ही सेवा पुरवली जाणार आहे. राज्यात हेलिकॉप्टर सेवा कमी दरात उपलब्ध आहे. मात्र ती सुद्धा ज्यांना परवडत नाही अशाच नागरिकांना ही सेवा दिली जाणार आहे. मनोज सिन्हा यांची काही महिन्यांपूर्वीच राज्यात नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी विकास प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला. राज्याला खास दर्जा देणारं कलम 370 हटविल्यानंतर राज्यात वेगळं वातावरण निर्माण झालं आहे. सध्या राज्याला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व जबाबदारी आता केंद्र सरकारची आहे. 370वं कलम हटविताना केंद्राने विकासाचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे सिन्हा यांनी आता अनेक उपक्रम हाती घेतले आहे. राज्यातल्या स्थानिक कलाकुसरीच्या वस्तूंना ऑनलाईन बाजारपेठ देण्यासाठी नुकसाच राज्यांने काही Online पुरवठा करणाऱ्या कंपन्यांसोबत करारही केला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या