Home /News /national /

Syed Ali Shah Geelani Death : जम्मू-काश्मीरमधील हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांचं निधन

Syed Ali Shah Geelani Death : जम्मू-काश्मीरमधील हुर्रियत नेते सय्यद अली शाह गिलानी यांचं निधन

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही यासंदर्भातील एक ट्विट केलं आहे आणि त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

    श्रीनगर, 1 सप्टेंबर : हुर्रियत नेता सय्यद अली शाह गिलानी यांचं निधन (Syed Ali Shah Geelani Death) झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. जम्मू-काश्मीरमधील हुर्रियत नेता म्हणून त्यांना ओळखलं जात होतं. त्यांच्या निधनानंतर जम्मू-काश्मीरमधील अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. जम्मू-काश्नीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही यासंदर्भातील एक ट्विट केलं आहे आणि त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. वयाच्या 92 व्या वर्षी सय्यद अली शाह गिलानी यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, गिलानी साहेबांच्या निधनाचं वृत्त खूप दु:खदायक आहे. त्यांच्या सर्वच गोष्ट पटायची असं नाही मात्र त्यांच्या कामाचा आदर आहे. हे ही वाचा-पंतप्रधान मोदींच्या हस्ते जालियनवाला बाग मेमोरियलचं उद्घाटन, पाहा PHOTOs 9 मार्च 1993 रोजी हुर्रियत कॉन्फरन्सचं गठण काश्मिरमधील फुटीरतावादी दलांच्या एकत्रित राजकीय व्यासपीठाच्या रुपात करण्यात आलं होतं. 91 वर्षीय गिलानी बरीच वर्षे नजरकैदेत होते. यादरम्यान त्यांची तब्येतदेखील बिघडली होती. मात्र 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटविण्यात आलं. त्यानंतर काश्मीरमध्ये अनेक हालचाली पाहायला मिळत होत्या. मात्र 2020 मध्ये त्यांनी फुटीरतावादी मंच ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्समधून वेगळं होत असल्याची घोषणा केली होती. हा अनेकांसाठी मोठा झटका होता. यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, ते ऑल पार्टी हुर्रियत कॉन्फरन्सला स्वत:पासून पूर्णपणे वेगळं करीत आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या